आकुर्डीमध्ये अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

आकुर्डीमध्ये अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

आकुर्डी : येथील आम आदमी पार्टीचे युवाध्यक्ष चेतन गौतम बेंद्रे यांच्या कार्यालयात विनायक सुबेदार चव्हाण व योगेश पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत पिंपरी चिंचवड शहरातील ई. १० वी , १२ वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

आप पिंपरी चिंचवडचे पदाधिकारी अनुप शर्मा, स्मिता पवार, किशोर जगताप, वैजनाथ शिरसाठ, वहाब शेख, यशवंत कांबळे.आकुर्डी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजित शितोळे, आपुलकी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सर्व पदाधिकारी व अन्य मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकनाथ पाठक आणि सुभाष चौधरी यांनी केले.