संविधान दिनानिमित्त आम आदमी पार्टीतर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप

संविधान दिनानिमित्त आम आदमी पार्टीतर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप

पिंपरी : आम आदमी पार्टीच्या वतीने संविधान दिनानिमित्त व आम आदमी पार्टीच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त नचिकेत बालग्राम विद्यामंदिर गुरुद्वारा वाल्हेकरवाडी येथील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूं व खाऊ वाटप करण्यात आले.

तसेच आपच्या वतीने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून संविधानाच्या प्रास्ताविक प्रतिमेचे सामूहिक वाचन करण्यात आले. पिंपरी येथील सावली निवारा केंद्र येथे अन्नदान करण्यात आले.

या वेळी आम आदमी पार्टी पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अनुप शर्मा, कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे, सामाजिक न्याय विंग अध्यक्ष वहाब शेख, कोर कमिटी सदस्य वैजनाथ शिरसाट, माधुरी मठ, कपिल मोरे, ब्रह्मानंद जाधव, एकनाथ पाठक, अमर डोंगरे, आशुतोष शेळके, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते