शिवशाहीच्या राज्यात एस.टी. कर्मचाऱ्यांशी मोगलशाही सारखी वागणूक का? : आप

शिवशाहीच्या राज्यात एस.टी. कर्मचाऱ्यांशी मोगलशाही सारखी वागणूक का? : आप

पिंपरी : राज्यातील एस. टी. कर्मचाऱ्यांनी वेतनवाढी सह एस. टी. महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या बेमुदत संपाला आम आदमी पार्टी, महाराष्ट्राने पाठींबा घोषीत केला आहे. वल्लभनगर आगारामध्ये चालू असलेल्या आंदोलमध्ये आम आदमी पार्टी, पिंपरी चिंचवड च्या पदाधिकाऱ्यांनी पत्र देऊन जाहीर पाठिंबा दिला.

एस. टी. कर्मचाऱ्यांच्या मागण्या ज्वलंत व रास्त असुन त्या सोडविण्याकरीता राज्य शासनाकडून सातत्याने होणारी दिरंगाई, संपाबाबत सकारात्मक भुमीका नसल्यामुळे, गावोगावी पोहोचलेली लालपरीचं खाजगीकरणाकडे होणारी वाटचाल पाहून आम आदमी पार्टी एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठींबा देत आहे व राज्य शासनाला विनंती करते की संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांवर कुठल्याही प्रकारची कठोर कार्यवाही करू नये.

शिवशाहीच्या राज्यात एस.टी. कर्मचाऱ्यांशी मोगलशाही सारखी वागणूक का? : आप

आंदोलनांच्या ठिकाणी बोलताना “शिवशाही च्या राज्यात एस.टी. कर्मचाऱ्यांशी मोगलशाही सारखी वागणूक का दिली जात आहे?” असा सवाल स्वप्नील जेवले यांनी केला.

शहराचे कार्यकारी अध्यक्ष चेतन गौतम बेंद्रे, जनसंपर्क प्रमुख वैजनाथ शिरसाट, सागर सोनावणे, स्वप्नील जेवले आणि आदी कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.