शिवसेना उपशहरप्रमुख हरेश नखाते यांच्या दिवाळी सेल्फी स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण

शिवसेना उपशहरप्रमुख हरेश नखाते यांच्या दिवाळी सेल्फी स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण
  • दिवाळी फराळ व स्नेहमेळावा कार्यक्रम उत्साहात

काळेवाडी : दिवाळी सणाचे औचित्य साधून आपण या मंगल व पवित्र सणात आपल्या कुटुंबासोबतच छान क्षण मोबाईल कॅमेऱ्यात सेल्फीद्वारे जतन करतो. याच सेल्फी छायाचित्रांची स्पर्धा शिवसेनेचे उपशहरप्रमुख हरेश नखाते यांच्या वतीने भरविण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस वितरण समारंभ काळेवाडी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

शिवसेना काळेवाडी-रहाटणी विभाग व उपशहरप्रमुख हरेश नखाते यांच्यावतीने दिवाळी फराळ व स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, कामगार नेते, इरफान शेख, मावळ युवा सेना अधिकारी अनिकेत घुले, सहसंपर्कप्रमुख योगेश बाबर, अनंत कोऱ्हाळे, सुनील हगवणे, हाजी दस्तगीर मणियार, नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, माजी नगरसेवक प्रमोद ताम्हणकर, रमेश काळे, बाबासाहेब भोंडवे, चंद्रकांत सरडे, देवाप्पा नखाते, विश्वनाथ नखाते, स्वीकृत सदस्य विनोद तापकीर, गोपाळ माळेकर, नरेंद्र माने, गोविंद वलेकर, अनिता पांचाळ, संजय गायखे, धर्मा पवार, प्रकाश लोहार, दिलीप भोंडवे, पैलवान किशोर नखाते, निलेश नखाते, रमेश नखाते, एकनाथ मंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

रणजित वडणे यांनी पटकावला प्रथम क्रमांक

सेल्फी स्पर्धेत पहिले बक्षीस रणजित वडणे, द्वितीय क्रमांक सचिन माळशिखरे व तृतीय क्रमांक स्वाती धांगडे यांनी पटकाविला. तर सहभागी सर्व स्पर्धकांना आयोजकांच्या वतीने उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. यावेळी काळेवाडी-रहाटणी परिसरातील हजारो नागरिकांनी हजेरी लावली होती.

शिवसेना उपशहरप्रमुख हरेश नखाते यांच्या दिवाळी सेल्फी स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण