करोना नियम पाळत पिंपरीत छठ पुजा कार्यक्रम उत्साहात | माँ होलकीदेवी प्रतिष्ठानतर्फे मोफत सेनिटायझर व मास्क वाटप

पिंपरी : माँ होलकीदेवी प्रतिष्ठानच्या वतीने सालाबादाप्रमाणे यावर्षीही झुलेलाल घाट येथे उत्तर भारतीय नागरिकांचा पवित्र सण असलेल्या छठ पूजा कार्यक्रमाचे बुधवारी सायंकाळी आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी माँ होलकीदेवी प्रतिष्ठानच्या वतीने मोफत सेनिटायझर व मास्क वाटप करण्यात आले. तसेच पिण्याच्या पाण्याचीही सुविधा करण्यात आली होती.

त्याप्रसंगी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी अर्जुन गुप्ता, माँ होलकीदेवी प्रतिष्ठानचे संस्थापक सुखलाल भारती, अध्यक्षा ज्योती भारती, कार्याध्यक्ष व भाजपा उत्तर भारतीय मोर्चा जिल्हा महामंत्री आकाश भारती, सचिव अनिल लखन, सहसचिव राजेश वडगुजर, हिशोबनीस रामकृष्ण वाढणे, सल्लागार सोहन शहानी व राजकुमार डेंगळे, स्विकृत नगरसेवक विनोद तापकीर, प्रमोद राम, पारस कुशवाह, प्रबोधनकार शारदा मुंढे, सुनिता यादव यांच्यासह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

करोना नियम पाळत पिंपरीत छठ पुजा कार्यक्रम उत्साहात | माँ होलकीदेवी प्रतिष्ठानतर्फे मोफत सेनिटायझर व मास्क वाटप

मोठ्या उत्साहामध्ये छठपूजा साजरी करत सुखी संसारासाठी, मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी सर्व उपवास करणाऱ्यांनी मावळत्या सूर्याला अर्घ्य अर्पण केले. या पूजेमध्ये मावळत्या सूर्याला अर्घ्य अर्पण करण्यापूर्वी पूजेसाठी बांबूची टोपली फळे, फुले, थेकुआ, तांदळाचे लाडू आणि पूजेशी संबंधित इतर वस्तूंनी सजवली होती.

दरम्यान, उपस्थित स्त्रियांनी आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि संसारासाठी सूर्यास्ताला अर्घ्य देऊन सुख, समृद्धी आणि सौभाग्याचा आशीर्वाद घेतला.

छठ पुजा कठीण व्रत

सूर्याच्या कठीण साधना आणि तपश्चर्येशी संबंधित असलेले व्रत हे सर्वात कठीण व्रतांपैकी एक आहे. ज्यामध्ये स्त्रिया आपल्या कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी ३६ तासांचा कोरडा उपवास करतात आणि हिवाळ्यात थंड पाण्यात उभे राहून सूर्याची भक्तिभावाने पूजा करतात. सूर्याला अर्घ्य वाहिल्यानंतर हे पवित्र व्रत मोडले जाते.