आमदार रोहित पवार यांची भरिव विकास कामे पाहून विरोधकांना पोटदुखी

आमदार रोहित पवार यांची भरिव विकास कामे पाहून विरोधकांना पोटदुखी

लोकमराठी न्यूज नेटवर्क

कर्जत (प्रतिनिधी) : आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघात सुरू केलेली भरिव विकास कामे पाहूनच विरोधकांना पोटदुखी झाली आहे. नगरपंचायत निवडणूकीत आपल्या भवितव्यास धोका निर्माण झाल्याने आ. रोहित पवार यांच्यावर खोटे आरोप करीत आहेत. असा पलटवार नगरसेविका मनीषा सोनमाळी यांनी केला आहे.

मागील दोन वर्षांपासून आमदार रोहित पवार यांनी विकासाचे एक ही मोठे काम केलेले नसून त्यांचा सोशल मीडिया, भिंतीवर आणि कागदावरच विकास सुरू आहे. अशी टिका भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील गटातील दादासाहेब सोनमाळी यांनी केली होती. या टीकेला आमदार पवार यांच्यावतीने उत्तर देण्यासाठी नगरसेविका मनीषा सोनमाळी यांनी पुढाकार घेऊन दादासाहेब सोनमाळी यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे.

देताना मनीषा सोनमाळी म्हणाल्या की, कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार रोहित पवार हे मतदारसंघात सध्या ‘आमदार आपल्या दारी’ हा अत्यंत लोकप्रिय असा उपक्रम राबवीत असुन त्याला जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमात आ. रोहित पवार यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित राहून जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करतात. त्यामुळे जनता खूप समाधानी आहे. आणि यामुळे येऊ घातलेल्या नगरपंचायत निवडणूकीत आपली दाळ शिजणार नाही या भितीपोटी विरोधक आ. रोहित पवार यांच्या वर खोटेनाटे आरोप करीत आहेत असा टोला दादासाहेब सोनमाळी यांचे नाव न घेता मनिषा सोनमाळी यांनी लगावला.