Tag: Karjat-jamkhed

विवेक तापकीर यांचा जामखेड तालुका केमिस्ट असोसिएशन तर्फे सत्कार 
पिंपरी चिंचवड

विवेक तापकीर यांचा जामखेड तालुका केमिस्ट असोसिएशन तर्फे सत्कार

पिंपरी चिंचवड : पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या सदस्यपदी विवेक मल्हारी तापकीर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल जामखेड तालुका केमिस्ट असोसिएशन तर्फे सत्कार करण्यात आला. काळेवाडीत झालेल्या सत्कार कार्यक्रमाला जामखेड तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष तात्यासाहेब बांदल, पारनेर सैनिक बँक जामखेडचे संचालक दत्तात्रय सोले उपस्थित होते. यावेळी तात्यासाहेब बांदल व दत्तात्रय सोले यांनी विवेक तापकीर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ...
KARJAT : आमदारांनी भाजपातील आयारामांना सोडून नगरपंचायत निवडणूक लढवावी – राम शिंदेचे रोहित पवार यांना खुले आव्हान
महाराष्ट्र

KARJAT : आमदारांनी भाजपातील आयारामांना सोडून नगरपंचायत निवडणूक लढवावी – राम शिंदेचे रोहित पवार यांना खुले आव्हान

भाजपाकडून १७ जागेसाठी ६३ इच्छुकांच्या मुलाखती संपन्न कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत नगरपंचायतीसाठी आपल्या सत्तेच्या काळात १५१ कोटी रुपयांचा विकासनिधी उपलब्ध करून विविध विकासकामाच्या माध्यमातून कर्जत शहराचा चेहरा-मोहरा बदलू शकलो, याचे आपणांस समाधान आहे. आगामी निवडणुकीत याच विकासकामाच्या जोरावर मतदार आपल्यावर विश्वास ठेवून पुन्हा भाजपाची सत्ता कायम राखण्यात सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन माजीमंत्री प्रा. राम शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी पक्षाचे निवडणूक निरीक्षक बाळासाहेब महाडीक, तालुकाध्यक्ष डॉ सुनील गावडे, जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, शहराध्यक्ष वैभव शहा, अनिल गदादे, पप्पू धोदाड, गणेश पालवे, सुमित दळवी आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना राम शिंदे म्हणाले की, मागील निवडणुकीत कर्जतकराच्या मतदानरुपी सहकार्यामुळे भाजपाची एक हाती सत्ता असताना कर्जत नगरपंचायतीच्या माध्यमा...
अहमदनगर जिल्हा बँकेच्या संचालकपदी बाळासाहेब साळुंके यांची निवड
महाराष्ट्र

अहमदनगर जिल्हा बँकेच्या संचालकपदी बाळासाहेब साळुंके यांची निवड

कर्जत : अहमदनगर जिल्हा बँकेच्या संचालकपदी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. दि.२६ रोजी अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या बोर्ड मिटींगमध्ये ही निवड करण्यात आली. या निवडीनंतर साळुंके यांच्या समर्थकांनी कर्जत व तालुक्यातील गावांमध्ये ठिकठिकाणी जल्लोष करत साळुंके कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या. काही महिन्यांपुर्वी पार पडलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बाळासाहेब साळुंके यांच्या पत्नी जिल्हा बँकेच्या माजी संचालिका तथा पंचायत समितीच्या माजी सभापती मिनाक्षी साळुंके यांना केवळ एका मताने पराभव झाला होता. मात्र हा पराभव केवळ तालुक्याच्याच नव्हे तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही जिव्हारी लागला होता. कारण मतदानाच्या अगोदर झालेल्या नाट्यमय खेळीची आणि त्यातच जवळ राहून कुरघोड्या केलेल्या तालुक्यातील अनेक नेत्यांच्या छुप्या डावाची चर्चाही लपू...
#Karjat कोरेगाव शिवारात बिबट्या मृत अवस्थेत
महाराष्ट्र

#Karjat कोरेगाव शिवारात बिबट्या मृत अवस्थेत

कर्जत : कोरेगाव (ता कर्जत) येथे चार वर्ष वयाचा बिबट्या मृत अवस्थेत आढळला. रामसिंग परदेशी यांच्या उसाच्या शेतात विशाल परदेशी या युवकाला प्रथमदर्शनी मृत बिबट्या दिसला. त्याने तात्काळ कर्जत वनविभागाशी संपर्क साधत सदर घटनेची माहिती दिली. सोमवारी (दि २२) सकाळी साडेदहाच्या सुमारास कोरेगाव येथील रामसिंग परदेशी यांच्या उसाच्या शेतात चार वर्ष वयाचा बिबट्या मृत आढळला. विशाल परदेशी या युवकाने तात्काळ कर्जतचे वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके यांना खबर दिली. शेळके यांनी वनविभागाचे कर्मचारी यांना सोबत घेत घटनास्थळ गाठले. जवळपास दोन-तीन दिवसापूर्वीच सदर बिबट्याचा नैसर्गीक मृत्यु झाला असल्याचे सांगितले. घटनास्थळी पंचनामा करून बिबट्याचे दहन करण्यात येईल, अशी माहिती मोहन शेळके यांनी पत्रकारांना दिली. डोंबाळवाडी आणि कोरेगाव शिवारात बिबट्याच्या दर्शनाने मोठी भीती निर्माण झाली होती. मात्र त्य...
Ahmednagar News : कर्जत नगरपंचायतीसाठी प्रभागनिहाय सुधारीत आरक्षण सोडत संपन्न
महाराष्ट्र

Ahmednagar News : कर्जत नगरपंचायतीसाठी प्रभागनिहाय सुधारीत आरक्षण सोडत संपन्न

कर्जत : कर्जत नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी नवीन आदेशानुसार पीठासीन अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले आणि सहायक पीठासीन अधिकारी गोविंद जाधव यांनी सोमवारी सकाळी ११ वाजता १५ प्रभागासाठी पुन्हा नव्याने आरक्षण सोडत पार पाडली. यामध्ये तीन प्रभागात बदल घडला असून बाकी ठिकाणी जैसे थे परिस्थिती राहिली आहे. नवीन आदेशानुसार कर्जत नगरपंचायतीच्या प्रभागासाठी पीठासीन अधिकारी डॉ अजित थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत नगरपंचायतीच्या १७ पैकी १५ प्रभागासाठी सोमवारी राजकीय पदाधिकाऱ्याच्या उपस्थितीमध्ये प्रभागनिहाय आरक्षण सोडत संपन्न झाली. प्रभाग क्रमांक १५ आणि १६ अनुसूचित जातीसाठी राखीव असून उर्वरित १५ प्रभागासाठी शुभ्रा श्रीकांत यादव, प्रणाली दीपक सुतार आणि राजवीर शिवानंद पोटरे या लहान मुलांकडून उपस्थितासमोर आरक्षण सोडत पार पडली. यामध्ये प्रभाग क्रमांक २ जोगेश्वरवाडी भागात नामा...
आमदार रोहित पवार यांची भरिव विकास कामे पाहून विरोधकांना पोटदुखी
महाराष्ट्र, राजकारण

आमदार रोहित पवार यांची भरिव विकास कामे पाहून विरोधकांना पोटदुखी

लोकमराठी न्यूज नेटवर्क कर्जत (प्रतिनिधी) : आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघात सुरू केलेली भरिव विकास कामे पाहूनच विरोधकांना पोटदुखी झाली आहे. नगरपंचायत निवडणूकीत आपल्या भवितव्यास धोका निर्माण झाल्याने आ. रोहित पवार यांच्यावर खोटे आरोप करीत आहेत. असा पलटवार नगरसेविका मनीषा सोनमाळी यांनी केला आहे. मागील दोन वर्षांपासून आमदार रोहित पवार यांनी विकासाचे एक ही मोठे काम केलेले नसून त्यांचा सोशल मीडिया, भिंतीवर आणि कागदावरच विकास सुरू आहे. अशी टिका भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील गटातील दादासाहेब सोनमाळी यांनी केली होती. या टीकेला आमदार पवार यांच्यावतीने उत्तर देण्यासाठी नगरसेविका मनीषा सोनमाळी यांनी पुढाकार घेऊन दादासाहेब सोनमाळी यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे. देताना मनीषा सोनमाळी म्हणाल्या की, कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार रोहित पवार हे मतदारसंघात सध्या...
आमदार रोहित पवार यांचा सोशल मीडिया, भिंतीवर आणि कागदावरच विकास सुरू
महाराष्ट्र

आमदार रोहित पवार यांचा सोशल मीडिया, भिंतीवर आणि कागदावरच विकास सुरू

लोकमराठी न्यूज नेटवर्क कर्जत (प्रतिनिधी) : आमदार पवार यांची कार्यपद्धती पाहता जनतेचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. मागील दोन वर्षांपासून आमदार रोहित पवार यांनी विकासाचे एक ही मोठे काम केलेले नसून त्यांचा सोशल मीडिया, भिंतीवर आणि कागदावरच विकास सुरू आहे. अशी टिका भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील गटातील दादासाहेब सोनमाळी यांनी केली. राम शिंदेंच्या काळात भाजपात एकाकी पडलेला विखे गट आता राम शिंदें बरोबर भाजपात जोमाने सक्रिय झाला. आणि आता आमदार रोहित पवार यांच्या कार्यपद्धतीवर टिका करू लागला आहे. यात भाजपातील विखे गटातील दादासाहेब सोनमाळी यांनी दिवाळीपूर्वी आमदार रोहित पवार यांच्या कार्य पद्धतीवर प्रसिद्धीपत्रकाद्वारे टिका केली आहे. सध्यातरी मतदारसंघात लहरी राजा - प्रजा आंधळी आणि अंधातरी दरबार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशी टीका भाजपाचे दादा सोनमाळी यांनी आमदार पवा...
महीला-मुलींनो कुणी त्रास देत असेल तर निर्भयपणे पुढे या! पोलिस तुमच्या पाठीशी, तुमचे नाव गोपनीय ठेवले जाईल!
महाराष्ट्र, मोठी बातमी

महीला-मुलींनो कुणी त्रास देत असेल तर निर्भयपणे पुढे या! पोलिस तुमच्या पाठीशी, तुमचे नाव गोपनीय ठेवले जाईल!

कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचे आवाहन कर्जत : 'महिला-मुलींनो तुम्हाला जर कुणी ज्ञात-अज्ञात त्रास देत असेल तर मनात कोणतीही भीती न बाळगता बिनधास्तपणे पुढे या.कर्जतच्या पोलीस ठाण्यात किंवा तुम्हाला शक्य असेल त्या दुरक्षेत्रात तक्रार द्या.तुमच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर कडक कारवाई करून होणाऱ्या त्रासापासून तुमची कायमची सुटका केली जाईल' असे आवाहन कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे. महिला-मुलींच्या सुरक्षीततेसाठी व त्यांच्या मनात असलेली भीती घालवण्यासाठी तसेच त्यांना सक्षम करण्यासाठी कर्जत पोलिसांनी अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तालुक्यातील अनेक शाळा-महाविद्यालयात जाऊन हजारो विद्यार्थिनींशी संवाद साधला आहे. पोलीसांनी सुरू केलेल्या 'भरोसा सेल' तसेच अनेक उपाययोजनांची माहिती त्यांना पटवून दिली आहे.&nb...
देशाच बजेट आहे की भाजपचं इलेक्शन पॅकेज | आमदार रोहित पवार यांची मोदी सरकारवर टिका
महाराष्ट्र, मोठी बातमी

देशाच बजेट आहे की भाजपचं इलेक्शन पॅकेज | आमदार रोहित पवार यांची मोदी सरकारवर टिका

मुंबई : निवडणुका असलेल्या राज्यांसाठी योजनांची केलेली खैरात पाहिली तर हे देशाचं बजेट आहे की भाजपचं 'इलेक्शन पॅकेज' आहे,अशी शंका येते. नाशिक आणि नागपूर मेट्रोसाठीची तरतूद वगळता देशाच्या तिजोरीत सर्वाधिक भर घालणाऱ्या महाराष्ट्राच्या तोंडाला बजेटमध्ये अक्षरशः पाने पुसण्यात आली. अशी जोरदार टिका कर्जत जामखेड (karjat-jamkhed) मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. आमदार पवार यांनी आपल्या सोशल मीडिया खात्यावर लिहिले आहे की, निर्गुंतवणुकीकरणावर दिलेला भर हे काही चांगलं लक्षण नाही. सोप्या शब्दांत सांगायचं तर वडिलोपार्जित संपत्ती विकून बाजारहाट करण्यासारखं आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मागणी वाढवण्याकडं आणि सीमेवर तणाव असतानाही लष्करासाठी भरीव तरतूद करण्याकडं सपशेल दुर्लक्ष करण्यात आलंय. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं पण ते कल्याण कसं करणार याची को...