#Karjat कोरेगाव शिवारात बिबट्या मृत अवस्थेत

#Karjat कोरेगाव शिवारात बिबट्या मृत अवस्थेत

कर्जत : कोरेगाव (ता कर्जत) येथे चार वर्ष वयाचा बिबट्या मृत अवस्थेत आढळला. रामसिंग परदेशी यांच्या उसाच्या शेतात विशाल परदेशी या युवकाला प्रथमदर्शनी मृत बिबट्या दिसला. त्याने तात्काळ कर्जत वनविभागाशी संपर्क साधत सदर घटनेची माहिती दिली.

सोमवारी (दि २२) सकाळी साडेदहाच्या सुमारास कोरेगाव येथील रामसिंग परदेशी यांच्या उसाच्या शेतात चार वर्ष वयाचा बिबट्या मृत आढळला. विशाल परदेशी या युवकाने तात्काळ कर्जतचे वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके यांना खबर दिली. शेळके यांनी वनविभागाचे कर्मचारी यांना सोबत घेत घटनास्थळ गाठले.

जवळपास दोन-तीन दिवसापूर्वीच सदर बिबट्याचा नैसर्गीक मृत्यु झाला असल्याचे सांगितले. घटनास्थळी पंचनामा करून बिबट्याचे दहन करण्यात येईल, अशी माहिती मोहन शेळके यांनी पत्रकारांना दिली. डोंबाळवाडी आणि कोरेगाव शिवारात बिबट्याच्या दर्शनाने मोठी भीती निर्माण झाली होती. मात्र त्याच्या मृत्युने परिसरातील शेतकऱ्यांची भीती नाहीशी झाली.