अनंतनगरमध्ये तुळशी विवाह सोहळा व दीपोत्सव उत्साहात

अनंतनगरमध्ये तुळशी विवाह सोहळा व दीपोत्सव उत्साहात

पिंपळे गुरव : अनंतनगर महिला मंडळ व अनंतनगर तरुण मित्र मंडळाच्या वतीने घरातीलच मुलीच्या विवाहाप्रमाणे दोन दिवस चाललेला सार्वजनीक तुळशी विवाह सोहळा उत्साहात पार पडला. त्यानिमित्त साई मंदिर परिसरात दीपोत्सव करण्यात आला होता. त्यावेळी परिसरातील आबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुळशी विवाह हा विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव आहे. याच अनुषंगाने अनंतनगरमद्ये तुळशी व विष्णूचे आधुनिक स्वरूपातील मुखवटे तयार करण्यात आले होते. पहिल्या दिवशी जात्यावर हळद दळण्यात आली. तर दुसऱ्या तुळशीचे रोप असलेल्या कुंडीची रंगरंगोटी करण्यात आली. बोर, चिंच, आवळा, सिताफळ, कांद्याची पात त्यात ठेवण्यात आले.

अनंतनगरमध्ये तुळशी विवाह सोहळा व दीपोत्सव उत्साहात

नंतर त्यांना हळद व तेल लावून मंगल स्नान घातले गेले. तुळशीला नवीन वस्त्र पांघरून त्यावर मांडव म्हणून उसाची खोपटी ठेवण्यात आली. पूजेचे उपचार समर्पण करून दोघांमध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा मोठ्या थाटामाटात विवाह लावण्यात आला. यानंतर तुळशीचे कन्यादान व मंत्रपुष्प आणि आरती करण्यात आली. या विधीच्या वेळी तुळशीभोवती दीप आराधना करण्यात आली होती.

व्हिडीओ पहा https://fb.watch/9rtpbIWTlB/

घरसंसार व गाडीतून वराड्यांना निरोप

दरम्यान, मुलीच्या विवाहात घरसंसार व आवश्यक वस्तू माहेरच्या मंडळींकडून मुलीला दिल्या जातात. त्याचप्रमाणे या तुळशीलाही या वस्तू कन्यादान वेळी देण्यात आल्या होत्या. तसेच नवरदेवाला प्लास्टिकच्या गाडीतून निरोप देण्यात आला. त्यानंतर तुळसीचा विधीवत गृहप्रवेशही करण्यात आला.

मंगलमय वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यास परिसरातील आबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी प्रसाद वाटप करण्यात आला. तसेच मंडळाच्या वतीने साकारण्यात आलेली रायगडाची प्रतिकृती प्रकाशमान करण्यात आली होती.