विवेक तापकीर यांचा जामखेड तालुका केमिस्ट असोसिएशन तर्फे सत्कार

विवेक तापकीर यांचा जामखेड तालुका केमिस्ट असोसिएशन तर्फे सत्कार 

पिंपरी चिंचवड : पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या सदस्यपदी विवेक मल्हारी तापकीर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल जामखेड तालुका केमिस्ट असोसिएशन तर्फे सत्कार करण्यात आला.

काळेवाडीत झालेल्या सत्कार कार्यक्रमाला जामखेड तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष तात्यासाहेब बांदल, पारनेर सैनिक बँक जामखेडचे संचालक दत्तात्रय सोले उपस्थित होते.

यावेळी तात्यासाहेब बांदल व दत्तात्रय सोले यांनी विवेक तापकीर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.