KALEWADI : काळेवाडीत नवरात्री नवरंग स्पर्धा व गौरी गणपती सजावट स्पर्धा बक्षिस समारंभ उत्साहात

KALEWADI : काळेवाडीत नवरात्री नवरंग स्पर्धा व गौरी गणपती सजावट स्पर्धा बक्षिस समारंभ उत्साहात
  • मा. नगरसेविका निता पाडाळे यांच्यातर्फे केले होते कार्यक्रमाचे आयोजन

काळेवाडी : संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्री नवरंग स्पर्धा २०२२ व गौरी गणपती सजावट स्पर्धा २०२२ मधील विजेत्यांचा बक्षिस समारंभ उत्साहात पार पडला. त्यानिमित्त महिलांसाठी आयोजित केलेल्या खेळरंगला पैठणीचा या कार्यक्रमाचा महिलांनी आनंदाचा लुटला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा महाराष्ट्र प्रदेश निमंत्रित सदस्य शंकरशेठ जगताप, स्पर्श फाउंडेशनच्या अध्यक्षा मोनिका सिक्का, माजी नगरसेविका निर्मला कुटे, आरती चौधे, सविता खुळे, काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा सायली नढे, स्विकृत नगरसेवक विनोद तापकीर, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य काळुराम नढे, दिलीप आंब्रे, प्रकाश लोहार, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पदमाकर जांभळे, दशरथ वीर, पांडुरंग पाडाळे, माजी नगरसेवक सागर आंघोळकर, अ‍ॅड हर्षद नढे, गितेश दळवी, सुनिल पवार, अरूण मैराळे, सुदाम खोमणे, विक्रम बाड, मुजावर शेख, अशोक पवार, काटकर, रामदास आंबेडकर, देशमुख काका, पिरपाशा जमादार आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेविका निता पाडाळे, संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास पाडाळे यांनी केले होते.

KALEWADI : काळेवाडीत नवरात्री नवरंग स्पर्धा व गौरी गणपती सजावट स्पर्धा बक्षिस समारंभ उत्साहात

यावेळी नवरात्री नवरंग स्पर्धा, गौरी सजावट स्पर्धा व पैठणी पटकावलेल्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. तसेच या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना माजी नगरसेविका निता पाडाळे (Nita Padale) यांच्यातर्फे आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.

KALEWADI : काळेवाडीत नवरात्री नवरंग स्पर्धा व गौरी गणपती सजावट स्पर्धा बक्षिस समारंभ उत्साहात
  • नवरात्री नवरंग स्पर्धा विजेते

नवरात्री नवरंग स्पर्धेत नवदुर्गा ग्रुपने प्रथम क्रमांक, साई श्रद्धा गार्डन ग्रुपने द्वितीय क्रमांक, आझाद कॉलनी दोन ग्रुपने तृतीय क्रमांक पटकाविला. तसेच प्रचिती महिला बचत गटाने चौथा व अष्टविनायक कॉलनी ग्रुपने पाचवा क्रमांक मिळविला.

KALEWADI : काळेवाडीत नवरात्री नवरंग स्पर्धा व गौरी गणपती सजावट स्पर्धा बक्षिस समारंभ उत्साहात
  • गौरी सजावट स्पर्धा विजेते

गौरी सजावट स्पर्धेत पुनम सागर गाढवे यांनी प्रथम क्रमांक, शुभांगी मनोज सुतार यांनी द्वितीय क्रमांक, प्रियंका शिंदे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. तर मंगल पंडीत जाधव यांनी चौथा तर वैशाली संदीप वाघमारे यांनी पाचवा क्रमांक मिळविला. तसेच पुजा गायकवाड यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

KALEWADI : काळेवाडीत नवरात्री नवरंग स्पर्धा व गौरी गणपती सजावट स्पर्धा बक्षिस समारंभ उत्साहात
  • या ठरल्या पैठणीच्या विजेत्या

यावेळी आयोजित केलेल्या खेळरंगला पैठणीचा या सांस्कृतिक कार्यक्रमात अनुक्रमे निलम बडजाते, प्रणिता अमीतकुमार शर्मा, कोमल गणेश वायभट या पैठणीच्या मानकरी ठरल्या.