शिवशाही व्यापारी संघाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी स्वप्निल शेलार यांची निवड

शिवशाही व्यापारी संघाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी स्वप्निल शेलार यांची निवड

पुणे : शिवशाही व्यापारी संघाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी स्वप्निल जयवंत शेलार यांची निवड करण्यात आली. याबाबत संघाचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले.

शिवशाही व्यापारी संघाचे प्रदेशाध्यक्ष धनंजय ढावरे यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हाध्यक्षपदी शेलार यांची निवड मध्यवर्ती कार्यालय मुंबई या ठिकाणाहून संस्थापक-अध्यक्ष दाखले यांनी जाहीर केली.

नवनियुक्त जिल्हाध्यक्षांनी सर्वसामान्य जनतेच्या, कलाकार बांधवांच्या व व्यापारी बांधवांच्या प्रश्नावर वाचा फोडण्यासाठी सदैव कटिबध्द राहण्याच्या सूचना देऊन पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी दाखले यांनी शुभेच्छा दिल्या.