
लोकमराठी न्यूज नेटवर्क
कर्जत (प्रतिनिधी) : आमदार पवार यांची कार्यपद्धती पाहता जनतेचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. मागील दोन वर्षांपासून आमदार रोहित पवार यांनी विकासाचे एक ही मोठे काम केलेले नसून त्यांचा सोशल मीडिया, भिंतीवर आणि कागदावरच विकास सुरू आहे. अशी टिका भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील गटातील दादासाहेब सोनमाळी यांनी केली.
राम शिंदेंच्या काळात भाजपात एकाकी पडलेला विखे गट आता राम शिंदें बरोबर भाजपात जोमाने सक्रिय झाला. आणि आता आमदार रोहित पवार यांच्या कार्यपद्धतीवर टिका करू लागला आहे. यात भाजपातील विखे गटातील दादासाहेब सोनमाळी यांनी दिवाळीपूर्वी आमदार रोहित पवार यांच्या कार्य पद्धतीवर प्रसिद्धीपत्रकाद्वारे टिका केली आहे. सध्यातरी मतदारसंघात लहरी राजा – प्रजा आंधळी आणि अंधातरी दरबार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशी टीका भाजपाचे दादा सोनमाळी यांनी आमदार पवार यांच्यावर केली. येत्या सहा महिन्यात मतदारसंघातील कामे पाहून माजी मंत्री राम शिंदे यांचे डोळे पांढरे होतील. या वाक्याचा दादा सोनमाळी यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात खरपूस समाचार घेतला.
- महिन्यापूर्वी लग्न झालेल्या जावयाचा सासरवाडीत खून
- ‘सायकलकरी वारकऱ्यांच्या’ पुणे-पंढरपूर-पुणे वारीमुळे पर्यावरण बचतीचा संदेश – संजयशेठ भिसे
- या कारणासाठी केला मित्राचा गोळ्या झाडून खून
- सिनेर्जी हॉस्पिटलमध्ये ह्रदयाची अवघड बेंटाल सर्जरी यशस्वीरित्या संपन्न
- पोलीस सारथीच्या काळेवाडी रहाटणी विभाग युवकाध्यक्षदी छगन जायभाये यांची नियुक्ती