Tag: MP Sujay Vikhe

आमदार रोहित पवार यांचा सोशल मीडिया, भिंतीवर आणि कागदावरच विकास सुरू
महाराष्ट्र

आमदार रोहित पवार यांचा सोशल मीडिया, भिंतीवर आणि कागदावरच विकास सुरू

लोकमराठी न्यूज नेटवर्क कर्जत (प्रतिनिधी) : आमदार पवार यांची कार्यपद्धती पाहता जनतेचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. मागील दोन वर्षांपासून आमदार रोहित पवार यांनी विकासाचे एक ही मोठे काम केलेले नसून त्यांचा सोशल मीडिया, भिंतीवर आणि कागदावरच विकास सुरू आहे. अशी टिका भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील गटातील दादासाहेब सोनमाळी यांनी केली. राम शिंदेंच्या काळात भाजपात एकाकी पडलेला विखे गट आता राम शिंदें बरोबर भाजपात जोमाने सक्रिय झाला. आणि आता आमदार रोहित पवार यांच्या कार्यपद्धतीवर टिका करू लागला आहे. यात भाजपातील विखे गटातील दादासाहेब सोनमाळी यांनी दिवाळीपूर्वी आमदार रोहित पवार यांच्या कार्य पद्धतीवर प्रसिद्धीपत्रकाद्वारे टिका केली आहे. सध्यातरी मतदारसंघात लहरी राजा - प्रजा आंधळी आणि अंधातरी दरबार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशी टीका भाजपाचे दादा सोनमाळी यांनी आमदार पवा...