संविधानिक मार्गाने शेतकरी जिंकला अहंकार हरला : आम आदमी पार्टी

संविधानिक मार्गाने शेतकरी जिंकला अहंकार हरला : आम आदमी पार्टी

पिंपरी : अखेर आज केंद्र सरकाने तीन काळे कृषी कायदे रद्द केले.हा शेतकऱ्यांचा खूप मोठा विजय आहे.भारताच्या लोकशाहीचाही हा ऐतिहासिक विजय आहे.आज संपूर्ण जगाला भारतातल्या शेतकऱ्यांनी दाखवून दिले की, शांततापूर्ण व लोकशाहीमार्गाने अन्यायाविरुद्ध लढा दिला तर न्याय मिळाल्याशिवाय राहत नाही.

स्वतंत्र भारताच्या इतिहासातील हे शेतकरी आंदोलन सर्वात मोठे व दिर्घकाळ चाललेले आंदोलन होते.सरकारने आपली सर्व शक्ति पणाला लावून हे आंदोलन चिरडून टाकण्याचा ध्यास घेतला होता.परंतू त्या दडपशाहीपुढे शेतकऱ्यांचा दृढनिश्चय अजिंक्य ठरला.या लढ्यात शेकडोंना प्राण गमवावे लागले.लाखो शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. म्हणूनच हा संघर्ष भविष्यातील अनेक लोकशाहीविघातक शक्तींविरुद्ध लढा देण्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

कृषी कायदे मागे घेणे ही भाजपाची राजकीय खेळी असली तरी अंतिमत: भारतीय लोकशाहीचा विजय झाला आहे, अशी प्रतिक्रीया पिंपरी चिंचवडचे आम आदमी पार्टीचे कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी दिली आहे.

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे गेल्या एक वर्षांमध्ये सातशेहुन अधिक शेतकऱ्यांना आपले बलिदान द्यावे लागले मंत्र्यानी शेतकर्याच्या अंगावरती गाड्या घातल्या, सरकारने पाण्याचे फवारे धुळ्याच्या नळकांड्या तारेचे कंपाउंड काचेच्या बाटल्या रस्त्यावरची फोडले गेले शेतकऱ्यांना आतंकवादी म्हटलं गेलं अशा या मोदी सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो शेवटी अहंकार हरला संविधानिक मार्गाने शेतकऱ्या जिंकला, अनेक राज्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारने तीन काळे कायदे माघार घेण्याची घोषणा केली यामध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश आले त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचे अभिनंदन 700 हून अधिक शहीद झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक कोटी रुपये द्यावेत, कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी द्यावी आणि शहीद झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने शहीदांचा दर्जा देण्यात यावा , या मंत्राच्या गाडीखाली चिरडला गेला त्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी अशी आम आदमी पार्टीची मागणी आहे असे आम आदमी पार्टी कोर कमिटी सदस्य वैजनाथ शिरसाट यांनी बोलतांना म्हटलं.

पिंपरी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर शेतकरी आंदोलनाला यश मिळाल्याबद्दल फटाके फोडून व लाडू वाटप करून आम आदमी पार्टी व विविध संघटना आणि पक्षांच्या वतीने जल्लोष करण्यात आला यावेळी आम आदमी पार्टीचे चेतन गौतम बेंद्रे,वैजनाथ शिरसाट,स्मिता पवार,नंदू नारंग,एकनाथ पाठक,ब्राह्मनंद जाधव,आशुतोष शेळके आदी विविध पक्षातील कार्यकर्ते उपस्थित होते