
- काँग्रेस शहराध्यक्ष कैलास कदम यांच्या उपस्थितीत शेकडो युवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
काळेवाडी : काँग्रेसचे युवा नेते किरण बाबाजी नढे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नागरिकांचा विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यामध्ये माजी सैनिक, निवृत्त पोलीस, निवृत्त शिक्षक, डॉक्टर, जेष्ठ नागरिक, समाजसेवक, वारकरी संप्रदाय, पत्रकार यांना विशेष सन्मानचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन शहराध्यक्ष कैलास कदम आणि किरण नढे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी नढे यांच्या नेतृत्वाखाली आयुब खान, प्रतीक चिंचवडे, यश पाटील, शाहरुख शेख, रोहित यादव, विशाल निटूने यांच्यासह काळेवाडीतील शेकडो युवकांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. तसेच उपस्थित मान्यवर व नागरिकांनी किरण नढे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्यदायी व यशदायी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष कैलास कदम, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंग वालिया, माजी नगरसेवक कैलास थोपटे, शहर सरचिटणीस सज्जी वर्की, सायली किरण नढे, ज्ञानेश्वर मलशेट्टी, सचिन कोंढरे, युनुस आतार, आबा खराडे, राहुल राऊत, करण सिंग गिल, एनएसयुआयचे प्रदेश उपाध्यक्ष उमेश खंदारे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, आदित्य खराडे, सेवादलचे अध्यक्ष वीरेंद्र गायकवाड, रवी नांगरे, हिरा जाधव, कै. विशालभाऊ नढे युवा मंचचे सदस्य तसेच काळेवाडी परिसरातील शेकडो युवा कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
शुभेच्छुकांचे आभार व्यक्त करताना किरण नढे म्हणाले की, या वाढदिवसाच्या निमित्ताने मी सर्वस्वी स्वतःला समाजासाठी वाहून घेण्याचा संकल्प केला आहे. आणि त्यासाठीच सर्वसामान्यांचा पक्ष म्हणून ओळख असलेल्या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी माझी नवीन राजकीय व सामाजिक इनिंग सुरू करीत आहे. भविष्यात माझा संपूर्ण वेळ हा काळेवाडी आणि काळेवाडीतील नागरिक यांच्या विकासासाठीच असेल. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी मी सदैव तत्पर असून नागरिकांनी कधीही माझ्याशी थेट संपर्क साधावा, असे आवाहनही किरण नढे यांनी नागरिकांना केले.
- PIMPRI CHANCHWAD : उताऱ्यात नोंद लावण्यासाठी चार लाखांची लाच; मंडलाधिकारी अटकेत
- PIMPRI:पत्नीच्या आत्महत्येस कारणीभूत ठरू नये म्हणून पतीने रचला बनाव…
- MUMBAI:प्रतिज्ञापत्रासाठी पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ…
- Jagtik Mahila Din 2025 : जागतिक महिला दिन का साजरा केला जातो
- Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना खरच २१०० मिळणार का; जाणून घ्या...