एस.एम. जोशी कॉलेजच्या विद्यार्थीनींचे वर्ल्ड रेकॉर्डस समूह नृत्य गायनात यश

एस.एम. जोशी कॉलेजच्या विद्यार्थीनींचे वर्ल्ड रेकॉर्डस समूह नृत्य गायनात यश

पुणे : एस.एम. जोशी कॉलेजमधील दिलशाद मुलाणी व गंगासागर भाकड या विद्यार्थिनींनी, मार्गम नृत्य अकादमी मार्फत आयोजित केलेल्या वर्ल्ड रेकॉर्डस समूह नृत्य गायनामध्ये सहभाग घेवून विविध प्रकारचे नृत्य सादर केले. त्याबद्दल त्यांना मॉर्गन नृत्य अकादमी मार्फत मेडल व प्रशस्तीपत्रक देवून गौरविण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्रचार्य डॉ. एन.एस. गायकवाड साहेब यांनी त्यांचे कौतुक करीत, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचा शैक्षणिक क्षेत्राबरोबरच, कला व क्रीडा क्षेत्रात चांगला नावलौकिक व्हावा यासाठी महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना सातत्याने प्रोत्साहन देण्याचे कार्य करीत आहे. विद्यार्थ्याच्या या यशात महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाला मोलाचा वाटा असून, विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी सांस्कृतिक विभागाचे चेअरमन डॉ. शिल्पा शितोळे, डॉ. अतुल चौरे, डॉ. नम्रता कदम, प्रा. मेघा तळपे, कार्यालय अधीक्षक परदेशी एस.ए. व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.