Tag: Pune News

जुन्रर परिसरात घरात घुसुन सोने व पैशावर डल्ला मारणाऱ्या सराईत गुन्हेगार जेरबंद; पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखणीय कामगिरी
पुणे

जुन्रर परिसरात घरात घुसुन सोने व पैशावर डल्ला मारणाऱ्या सराईत गुन्हेगार जेरबंद; पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखणीय कामगिरी

पुणे, दि ७ (लोकमराठी) - जुन्नर परिसरात दशक्रिया विधीसाठी घरातील लोक बाहेर गेल्याचा फायदा घेवुन घरात घुसुन सोने व पैशावर डल्ला मारणाऱ्या सराईत गुन्हेगारास जेरबंद करत ५ लाख ४६ हजार ४८१ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यास पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. आकाश प्रकाश विभुते (वय ३२ वर्षे, सुपली, पो. पळशी, ता. पंढरपुर, जि. सोलापुर, सध्या रा. फुलसुंदर अपार्टमेंट, आनंदवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे) असे या सरईत गुन्हेगाराचे नाव आहे. पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण जिल्हात वाढत्या घरफोडयाचे प्रमाण लक्षात घेवुन पुणे ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना घरफोड्यांबाबत वैयक्तीक दृष्टया लक्ष देवून कारवाई करणेबाबत सुचना केल्या होत्या. स्थानिक ग...
खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते राष्ट्रवादी अर्बन सेलच्या समन्वयकांना नियुक्ती पत्र वाटप
राजकारण

खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते राष्ट्रवादी अर्बन सेलच्या समन्वयकांना नियुक्ती पत्र वाटप

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी (दि. १० ऑक्टोबर) : राष्ट्रवादी अर्बन सेलच्या प्रदेशाध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते शहर राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेलच्या समन्वयकांना नियुक्तीपत्र देण्यात आले. अर्बन सेलचे शहराध्यक्ष दत्तात्रय जगताप, महिला अध्यक्ष मनीषा गटकळ यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांमध्ये २५ महिला व २५ पुरुष असे ५० पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. प्रत्येक समन्वयकांना पक्षाची जबाबदारी देताना प्रत्येकाला आपल्या आपल्या कार्याची जाणीव करून खासदार वंदना यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. सर्व नवनियुक्त समन्वयकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे व महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट यांनीही नवनियुक्त समन्वयकांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी युवक अध्यक्ष इम्रान शेख, पक्षाचे प्रवक्...
सोसायटीधारकांचे प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी कटिबद्ध – विरोधी पक्षनेते अजित पवार
राजकारण, पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

सोसायटीधारकांचे प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी कटिबद्ध – विरोधी पक्षनेते अजित पवार

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी-चिंचवड : भारतीय जनता पक्षाची महापालिकेत पाच वर्षे सत्ता होती. मात्र, या सत्ता काळात भाजपने शहरातील सोसायटी धारकांचे प्रश्न सोडविले नाहीत. त्यामुळे सोसायटी धारकांचे प्रश्न गंभीर झाले आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटीबद्ध असल्याची ग्वाही राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बुधवारी (ता. ५) दिली. शहरातील सोसायटीधारकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते पवार सोसायटीधारकांशी थेरगाव येथे सोसायटीधारकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी पवार बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर संजोग वाघेरे, योगेश बहल, महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे, माजी नगरसेवक राहुल भोसले, मयूर कलाटे,...
संभाजी ब्रिगेडचा दणका ; शिवाजी महाराजांचा अवमान करणारे पोस्टर हटविले
पिंपरी चिंचवड

संभाजी ब्रिगेडचा दणका ; शिवाजी महाराजांचा अवमान करणारे पोस्टर हटविले

मागणी लावून धरल्यानंतर इंद्रायणीनगर मधील माजी नगरसेवकाचा लेखी माफीनामा सादर पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे फ्लेक्स शहरात लावले होते. त्याविरोधात संभाजी ब्रिगेडने आवाज उठविला. संबंधीत आरएसएसच्या कार्यकर्त्याला संपर्क करून जाब विचारला. पोस्टर न हटविल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. संभाजी ब्रिगेडच्या दणक्याने संबधीत कार्यकर्त्याने शहरातील फ्लेक्स हटविले. तसेच लेखी माफीनामाही सादर केला असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सतीश काळे यांनी दिली. काळे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व महाराष्ट्र राज्यातील बहुजनांचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या विचारांवर चालणारी अनेक पिढी तयार होत आहे. राजांनी रयतेचे राज्य निर्माण करताना सर्व जाती धर्मातील नागरिकांचा विचार केला. मानसन्...
घेऊन पन्नास खोके तरुणांना राज्य सरकारने दिले धोके | राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे निषेध आंदोलन
पिंपरी चिंचवड

घेऊन पन्नास खोके तरुणांना राज्य सरकारने दिले धोके | राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे निषेध आंदोलन

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी, ता. १६ : सुमारे दीड लाख तरुणांना रोजगार देणारा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प तळेगाव येथून गुजरातला गेल्यामुळे संबंध महाराष्ट्रातील युवकांमध्ये तीव्र रोष पाहायला मिळतोय. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहरअध्यक्ष इम्रान शेख यांच्या नेतृत्वाखाली स्पाइनसिटी मॉल भोसरी येथे केंद्र व महाराष्ट्र सरकार यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना इम्रान शेख म्हणाले की, प्रत्येक वर्षी दोन कोटी नोकऱ्या युवकांना देऊ असं म्हणून सरकारमध्ये बसणारी भाजपा व त्याचे नेते यांनी नोकऱ्या तर दिल्या नाहीत. परंतु, आहेत त्या नोकऱ्या सुद्धा महाराष्ट्रातील तसेच पिंपरी चिंचवड मधीलयुवकाकडून हिरावून घेतल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फड...
कवी डॉ. संतोष पवार व डॉ. उमेश शिरसट यांना मसापचा विशेष ग्रंथ पुरस्कार मिळाल्याबद्दल एस. एम. जोशी कॉलेजमध्ये सत्कार
पुणे, शैक्षणिक

कवी डॉ. संतोष पवार व डॉ. उमेश शिरसट यांना मसापचा विशेष ग्रंथ पुरस्कार मिळाल्याबद्दल एस. एम. जोशी कॉलेजमध्ये सत्कार

हडपसर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेजचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी कवी डॉ. संतोष पवार व डॉ. उमेश शिरसट यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा विशेष ग्रंथ पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार केला. कवी डॉ. संतोष पवार यांच्या 'नव्वदोत्तरी मराठी कविता संकल्पना स्वरूप आणि वाटचाल' या प्रबंधाला उत्कृष्ट प्रबंध लेखनासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा शरच्चंद्र भालेराव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. तसेच डॉ. उमेश शिरसट यांना २०१९ या वर्षातील महाराष्ट्र साहित्य पत्रिकेमधील जी. ए. कुलकर्णी यांच्या कथेवरील लेखाला ताईसाहेब कदम पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले. त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी त्यांचे अभिनंदन करीत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. संजय जडे, डॉ. किशोर काकडे, डॉ. राजें...
एस.एम. जोशी कॉलेजच्या विद्यार्थीनींचे वर्ल्ड रेकॉर्डस समूह नृत्य गायनात यश
पुणे, क्रीडा

एस.एम. जोशी कॉलेजच्या विद्यार्थीनींचे वर्ल्ड रेकॉर्डस समूह नृत्य गायनात यश

पुणे : एस.एम. जोशी कॉलेजमधील दिलशाद मुलाणी व गंगासागर भाकड या विद्यार्थिनींनी, मार्गम नृत्य अकादमी मार्फत आयोजित केलेल्या वर्ल्ड रेकॉर्डस समूह नृत्य गायनामध्ये सहभाग घेवून विविध प्रकारचे नृत्य सादर केले. त्याबद्दल त्यांना मॉर्गन नृत्य अकादमी मार्फत मेडल व प्रशस्तीपत्रक देवून गौरविण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्रचार्य डॉ. एन.एस. गायकवाड साहेब यांनी त्यांचे कौतुक करीत, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचा शैक्षणिक क्षेत्राबरोबरच, कला व क्रीडा क्षेत्रात चांगला नावलौकिक व्हावा यासाठी महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना सातत्याने प्रोत्साहन देण्याचे कार्य करीत आहे. विद्यार्थ्याच्या या यशात महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाला मोलाचा वाटा असून, विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी सांस्कृतिक विभागाचे चेअरमन डॉ. शिल्पा शितोळे, ...
स्वारगेट पोलीस वसाहतीचे कचरा डेपोत रूपांतर : पोलीस कर्मचारी व कुटुंबियांचे आरोग्य धोक्यात 
पुणे, मोठी बातमी

स्वारगेट पोलीस वसाहतीचे कचरा डेपोत रूपांतर : पोलीस कर्मचारी व कुटुंबियांचे आरोग्य धोक्यात

पुणे शहर कचरा पेटी (कंटेनर) मुक्त तर पोलीस वसाहतीत कचरा व पेट्यांचा खच पुणे, ता. १४ सप्टेंबर २०२२ : पुणे महापालिकेकडून पुणे शहर कचरा पेटी मुक्त करण्याच्या प्रयत्नात स्वारगेट पोलीस वसाहतीचे कचरा डेपोमध्ये रूपांतर केल्याचे दिसून येत आहे. पुणे महापालिकेचे कर्मचारी या ठिकाणी कचऱ्याचा साठा करताना दिसत आहेत. स्वारगेट परिसरातील हॉटेल, भाजी मंडई येथील सडलेला कचरा या ठिकाणी आणून ठेवला जात असून मोठ्या प्रमाणात साठा केला जात आहे. हा कचरा गोळा करण्यासाठी तसेच त्याची व्हिलेवाट लावण्यासाठी पुणे महापालिका कर्मचारी पैसे देखील घेत असल्याचे दिसून येत आहेत. हे पैसे घेऊन हा कचरा पोलीस वसाहतीत टाकला जात आहे. दोन ते चार दिवस या पेट्या (कंटेनर) उचल्या जात देखील नाहीत त्यामुळे कॉलनीतील पोलीस कुटुंबियांचे आरोग्य धोक्यात आले आहे तसेच डेंगू, मलेरिया व साथीच्या रोगांनी कर्मचारी व कुटुंबीय त्रस्त झाले ...
कोविड काळात काम करणाऱ्या ६८७ कामगारांना कायम करा : यशवंत भोसले
पिंपरी चिंचवड

कोविड काळात काम करणाऱ्या ६८७ कामगारांना कायम करा : यशवंत भोसले

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत कोविड काळामध्ये मानधनावर काम करणाऱ्या ६८७ कामगारांना कायम सेवेत सामावून घ्यावे, असे आदेश राज्य सरकारने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला दिले आहेत. अशी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी पिंपरी येथे पत्रकार परिषदेत दिली. याविषयी अधिक माहिती देताना यशवंत भोसले यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत कोरोना काळामध्ये एएनएम, जीएनएम नर्सेस, टेक्निशियन अशा विविध पदांवर मानधनावर कर्मचारी काम करीत होते. या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घ्यावे असा ठराव पिंपरी चिंचवड महापालिकेने १८ मार्च २०२० रोजी मंजूर केला होता. हा ठराव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला होता. यामध्ये आरोग्य व वैद्यकीय विभागातील विविध पदांचा समावेश होता. या ठरावास शासनाची मंजुरी मिळण्याच्या अगोदरच पिंपरी चिंचवड आयुक्तांनी २०२१ मध्ये नर्सेस व आरोग्यातील तांत्रिक कर्म...
पत्रमहर्षी आचार्य अत्रे पुरस्कार शीतल करदेकर यांना जाहीर
पुणे

पत्रमहर्षी आचार्य अत्रे पुरस्कार शीतल करदेकर यांना जाहीर

आचार्य अत्रे जयंतीनिमित्त हास्य-विनोद आनंद महोत्सव पुणे : आचार्य अत्रे यांच्या जयंतीनिमित्त आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठानतर्फे ‘हास्य-विनोद आनंद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. ११ ते १३ ऑगस्ट या कालावधीत शिवाजीनगर येथील लकाकी रस्त्यावरील आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठान, विनोद विद्यापीठ येथे हा महोत्सव पार पडेल, अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष ॲड. बाबूराव कानडे यांनी दिली. यावेळी प्रतिष्ठानचे विश्वस्त वसंतराव कुलकर्णी, कमलाकर बोकील, सल्लागार डॉ. आनंद देशपांडे आदी उपस्थित होते. महोत्सवाचे उद्‌घाटन गुरुवारी (ता. ११) विसुभाऊ बापट यांच्या हस्ते सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. त्यानंतर ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ हा कार्यक्रम सादर होणार आहे. १२ ऑगस्ट रोजी इंद्रधनू हा कार्यक्रम सादर होणार आहे. तर, १३ ऑगस्टला न्यायमूर्ती राजेश केतकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण समारंभाने मह...