राजकारण

राजकारण Politics News Mrathi – LokMarathi News

खासदार संजय सिंग उद्या पुण्यात ; महाराष्ट्र युवा अधिवेशनाला करणार संबोधित
पुणे, राजकारण

खासदार संजय सिंग उद्या पुण्यात ; महाराष्ट्र युवा अधिवेशनाला करणार संबोधित

पुणे : आम आदमी पार्टी युवा आघाडीचे महाराष्ट्र युवा अधिवेशन रविवारी (ता. ३१ जुलै) बिबवेवाडी येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात होत आहे. या अधिवेशनाला आम आदमी पार्टीचे ज्येष्ठ नेते व राज्यसभा खासदार संजय सिंग (Sanjay Singh) यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे 'आप' युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. खा. संजय सिंग यांच्याबरोबरच दिल्ली विधानसभेचे सर्वात तरुण आमदार कुलदीप कुमार व गोव्याचे आमदार वेंझी वेगस यांची कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती असणार आहे. या अधिवेशनामध्ये रोजगार, शिक्षण, आरोग्य, राष्ट्रनिर्माणामध्ये युवकांचा सहभाग या काही प्रमुख विषयांवर चर्चा होणार असल्याचे युवा आघाडी उपाध्यक्ष व अधिवेशनाचे समन्वयक संदीप सोनवणे यांनी सांगितले. खा. संजय सिंग यांचे आगमन सकाळी 10 वाजून 40 मिनिटांनी पुणे विमानतळावर आगमन होणार असून ते 11:15 वाजता बिबवेवा...
एकनाथ शिंदे यांचा फोटो म्हणून फिरणारा बाबा कांबळे आहेत तरी कोण?
पिंपरी चिंचवड, राजकारण

एकनाथ शिंदे यांचा फोटो म्हणून फिरणारा बाबा कांबळे आहेत तरी कोण?

https://youtu.be/_JpU4RHrFnc रिक्षा सोबत असलेल्या फोटो संदर्भात अजित पवार यांचा बाबा कांबळे यांना फोन पिंपरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रिक्षा सोबतचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. मात्र, तो फोटो मुख्यमंत्री शिंदे यांचा नसून पिंपरीतील महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांचा असल्याचे समोर आले आहे. त्यासंदर्भात माजी उपमुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांना फोन करून 'बाबा तो फोटो तुझाच आहे का?' अशी विचारणा करत व्हायरल फोटो मागील सत्य जाणून घेतले. रिक्षा चालक-मालक, घरेलू कामगार महिला, पथारी, हातगाडी, टपरीधारकांचे प्रश्न सोडविण्यासाठी रस्त्यावर संघर्ष करणारे नेतृत्व बाबा कांबळे यांचे आहे. उपोषण, मोर्चे, धरणे आंदोलन करत महापालिका प्रशासन, राज्य शासनाला धारेवर धरून अनेकां...
हिंदुत्व विचारासाठी सत्ता परिवर्तन झाले ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत प्रतिपादन
महाराष्ट्र, राजकारण

हिंदुत्व विचारासाठी सत्ता परिवर्तन झाले ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत प्रतिपादन

मुंबई, ता २३ : हिंदुत्व विचाराच्या रक्षणासाठी राज्यात सत्ता परिवर्तन झाले असून बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारांचे खरे वारसदार भाजपा बरोबर आले आहेत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शनिवारी पनवेल येथे भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या समारोप प्रसंगी केले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात निर्माण झालेला विकासाचा अनुशेष त्वरेने पूर्ण करून महाराष्ट्राला देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवू, असा विश्वासही श्री.फडणवीस यांनी व्यक्त केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, प्रदेश प्रभारी सी.टी.रवी, सह प्रभारी ओमप्रकाश धुर्वे व जयभान पवैय्या, राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रदेश सरचिटणीस आ. श्रीकांत भारतीय (Shrikant Bhartiya) आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. श्री. फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडी ...
आरपीआयच्या महिला उपशहराध्यक्षा सुनिता गायकवाड यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
राजकारण, पिंपरी चिंचवड

आरपीआयच्या महिला उपशहराध्यक्षा सुनिता गायकवाड यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

पिंपरी, ता. २० : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आरपीआय) महिला उपशहराध्यक्षा सुनिता केशव गायकवाड व कार्यकर्ता कांता दत्तु मोरे यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम व महिला शहराध्यक्षा सायली किरण नढे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यावेळी माजी नगरसेवक सद्गुरु कदम, विठ्ठल शिंदे, दहीतुले अण्णा, अर्जुन लांडगे, आकाश शिंदे, किरण नढे, जुबेर खान आदी उपस्थित होते. ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्ट कारभारामुळे जनताच भाजपला हद्दपार करणार – अजित गव्हाणे
पिंपरी चिंचवड, राजकारण

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्ट कारभारामुळे जनताच भाजपला हद्दपार करणार – अजित गव्हाणे

पिंपरी : गेल्या पाच वर्षांत (PCMC) पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी केलेल्या भ्रष्ट कारभारामुळे शहरातील जनताच भाजपला सत्तेतून हद्दपार करणार आहे. राज्यातील सत्ता बदलचा महापालिका निवडणुकीवर कोणताच परिणाम होणार नसून विजय आपलाच आहे. शंभर प्लस हे आपले मिशन असून ते साध्य करण्यासाठी आतापासूनच कामाला लागा, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केले आहे. काळेवाडीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची शहर कार्यकारणी बैठक उत्साहात संपन्न झाली. यावेळी अजित गव्हाणे बोलत होते. पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनियुक्त कार्यकारणी, विधानसभा कार्यकारी, सर्व सेलची कार्यकारणी तसेच प्रभाग अध्यक्ष, आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थिती पहिली मासिक सभा पार पडली. त्याप्रसंगी महिला अध्यक्षा कविता आल्हाट, युवक अध्यक्ष इ...
डॉ. सागर वागज यांचा आम आदमी पार्टीत प्रवेश
पिंपरी चिंचवड, राजकारण

डॉ. सागर वागज यांचा आम आदमी पार्टीत प्रवेश

चिंचवड : डॉ. सागर वागज (Dr Sagar Wagaj) यांनी आज आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला. पिंपरी चिंचवड शहर महिला अध्यक्षा स्मिता पवार यांच्या हस्ते त्यांचा प्रवेश करण्यात आला. यावेळी डॉक्टर विंग अध्यक्ष अमर डोंगरे, पुणे जिल्हा सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष वहाब शेख, पिंपरी चिंचवड आम आदमी पार्टी संपर्कप्रमुख वैजनाथ शिरसाट, आप पिंपरी चिंचवड प्रवक्ते प्रकाश हगवणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. वागज होमिओपॅथी हॉस्पिटलच्या (Wagaj Homeopathic Hospital) माध्यमातून गेली १६ वर्षापासून पूर्णानगर, शाहूनगर व संभाजीनगर या भागामधील नागरिकांना ते सेवा देत आहेत. डॉ. सागर वागज म्हणाले की, "(Aam Aadmi Party) आम आदमी पार्टीचे दिल्ली (Delhi) आणि पंजाब (Panjab) येथील काम पाहून मी प्रेरित होऊन आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. आज केंद्र सरकार (Central Government) व राज्य सरकार State...
सिनेट निवडणुकीसाठी शहरातून १५००० पदवीधरांची नोंदणी करणार : अजित गव्हाणे
राजकारण

सिनेट निवडणुकीसाठी शहरातून १५००० पदवीधरांची नोंदणी करणार : अजित गव्हाणे

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी, ता. १ जुलै : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सिनेट निवडणुकीसाठी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या मार्गदर्शनात बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादी प्रदेशचे विध्यार्थी आघाडीचे अध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी मागील निवडणुकीची रणनीती सांगितली. शहर राष्ट्रवादी शिक्षक सेलचे अध्यक्ष डॉ. संदीप तापकीर यांनी पदवीधरांची नोंदणी कशीकरायची याबद्दल मार्गदर्शन केले. पदवीधर संघाचे शहराध्यक्ष माधव पाटील यांनी सिनेट निवडणूक का महत्त्वाची, हे सांगितले. यावेळी माधव पाटील म्हणाले की, शहरातून सिनेटवर एक तरी प्रतिनिधी निवडून जावा यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. शहरातील विद्यार्थ्यांना विद्यापीठातील अनेक योजनांचा फायदा मिळवून देण्यासाठी शहर राष्ट्रवादीने पदवीध...
उपमुख्यमंत्र्यांना भाषण करू न देणे, हा भाजपचा कपटीपणा : दत्तात्रय जगताप
राजकारण

उपमुख्यमंत्र्यांना भाषण करू न देणे, हा भाजपचा कपटीपणा : दत्तात्रय जगताप

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क देहू : येथील संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना भाषण करू न देणे, हा भाजपचा कपटीपणा आहे. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अर्बन सेलचे शहराध्यक्ष दत्तात्रय जगताप (Dattatray Jagtap) यांनी व्यक्त केली आहे. जगताप म्हणाले की, श्रीक्षेत्र देहू (Dehu) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते संत तुकाराम महाराजांच्या शिळामंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला राज्यातील भाजपचे मोठे नेते उपस्थित होते, परंतु पंतप्रधान येणार म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रोटोकॉल नुसार, किंवा राजशिष्टाचार म्हणून स्वतः उपस्थित होते. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत करण्यासाठी अजित पवार हे विमानतळावरही उपस्थित होते. रा...
प्रशासक नेमून महानगरपालिकेची सत्ता चालवणाऱ्या अजित दादांना पिंपरी-चिंचवडला सुविधा देण्यापासून कोणी रोखलंय – आप
राजकारण

प्रशासक नेमून महानगरपालिकेची सत्ता चालवणाऱ्या अजित दादांना पिंपरी-चिंचवडला सुविधा देण्यापासून कोणी रोखलंय – आप

प्रतिभा आणि प्रतिमा असलेल्या उमेदवारांना निवडून द्या; "आप"च्या स्वराज्य निर्धार मेळाव्यात नागरिकांना आवाहन पिपरी : रविवार (दि. ५ जून) रोजी पिंपरी चिंचवड मधील पाटीदार भवन येथे पक्षाचा स्वराज्य मेळावा मोठ्या जल्लोषात पार पडला. आपचे महाराष्ट्र राज्य निवडणूक प्रमुख महादेव नाईक, राज्य अध्यक्ष रंगा राचुरे, राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार, राज्य सचिव धनंजय शिंदे, युवाध्यक्ष अजिंक्य शिंदे, आप वाहतूक विंग महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्रीकांत आचार्य, पुणे जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत, युवा उपाध्यक्ष संदीप सोनावणे, पिंपरी चिंचवड कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे, आप पिंपरी चिंचवड प्रमुख अनुप शर्मा व इतर अनेक पदाधिकारी यावेळी मंचावर उपस्थित होते. या सोबतच शहरातल्या अनेक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं या वेळी आम आदमी पक्षा मधे प्रवेश केला या मेळाव्यात निवडणूक प्रभारी महादेव नाईक...
सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब जगताप राष्ट्रवादीच्या वाटेवर
राजकारण

सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब जगताप राष्ट्रवादीच्या वाटेवर

पिंपरी, ता. ३ : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विचारांना प्रभावित होऊन काळेवाडीतील सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब जगताप हे राष्ट्रवादीत दाखल होण्याची शक्यता आहे. आगामी महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३२ मधून एससी प्रवर्गातून जगताप रिंगणात असून काळेवाडीत प्रथमच अनुसूचित जातीसाठी आरक्षण पडल्याने बाबासाहेब जगताप यांच्या रूपाने सामाजिक जाणीव व मागासवर्गीयांसाठी झटणार चेहरा मिळाल्याचे बोलले जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज शहरात दौरा होता. त्यावेळी शहरातील विविध कामांचे उद्धाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. याच दौऱ्यादरम्यान दुपारी श्री. पवार काळेवाडीत आले होते. त्यावेळी समस्थ बहुजन समाजाच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संगमरवरी मुर्ती भेट देण्यात आली. त्या प्रसंगी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी शहराध...