राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व पवार कुटुंबीयावर बोलण्याची मोहित कंबोजची लायकी नाही : इम्रानभाई शेख

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व पवार कुटुंबीयावर बोलण्याची मोहित कंबोजची लायकी नाही : इम्रानभाई शेख
  • कुंभोज यांच्या टिकेला राष्ट्रवादी युवकचे सणसणीत प्रत्युत्तर
  • लायकीत राहून विधान करण्याचा दिला इशारा

पिंपरी : राजकीय क्षेत्रात कर्तव्यशून्य असलेल्या मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांवर आरोप सुरु केले आहेत. राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोप-यात लोकांची कामे केली. आमचे प्रेरणास्थान व मार्गदर्शक शरद पवार साहेब, विरोधी पक्षनेते अजितदादा, खासदार सुप्रियाताई सुळे, आमदार रोहितदादा हे कायम लोकांच्या संपर्कात असतात. म्हणूनच राज्यातील जनता राष्ट्रवादी आणि पवार कुटुंबियांच्या पाठीशी असते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आरोप करण्याएवढी मोहित कंबोज यांची उंची नाही, कुंबोज यांनी आपल्या लायकीत राहून विधान करावे, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष इम्रानभाई शेख यांनी दिला आहे.

भाजपा नेते मोहित कंबोज गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या अटकेबाबत ट्वीट करून संभ्रम निर्माण करत आहेत. तसेच, नुकतेच बारामती ऍग्रो लिमिटेडचा अभ्यास सुरु असून त्याचे तपशील मांडू, असेही ट्वीट केले जात आहे. मोहित कंबोज यांच्या या ट्वीटला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष इम्रानभाई शेख यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भाजपा आणि त्यांचा मित्रगट (शिंदे गट) यांच्यामध्ये अनेक भ्रष्ट नेते आहेत. भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या रडारवर अनेक नेते होते. मंत्री संजय राठोड यांच्यावर एका मुलीच्या आत्त्महत्येचे आरोप भाजपाच्याच नेत्या चित्रा वाघ यांनी केले. मंत्री प्रताप सरनाईकांना ईडीने नोटीस दिली. किरीट सोमय्या यांच्यावर आईएनएस विक्रांत निधी घोटाळ्याचा आरोप आहे. यांच्यासह अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. मोहित कंबोज यांनी आधी भ्रष्टाचाराने बरबटलेल्या या नेत्यांकडे लक्ष द्यावे, नंतर इतरांचे पाहावे. ‘आपले ठेवायचे झाकून आणि इतरांचे बघायचे वाकून’ ही सवय बंद करावी, अशी खरमरीत टीका इम्रान शेख यांनी केली.

भाजपा नेते म्हणवनारे कंबोज अधिकाऱ्यांशी संगनमत करून लोकांना ब्लॅकमेल करत आहेत. आपल्या पक्षातील नेत्यांची मर्जी सांभाळायची आणि स्वतः चर्चेत राहायचे हा उद्योग त्यांनी सुरु केला आहे. भाजपा नेत्यांचे सेटिंग करण्याचे काम ते करत आहेत की काय, असा सवाल उपस्थित होत आहे. कंबोज हे तर बॅंक कर्रप्ट व्यक्तीमत्व आहे. त्यांनी इतरांना शहाणपणा शहानपण शिवकण्याची गरज नाही. भाजपा केवळ ठराविक लोकांच्या तुंबड्या भरण्याचे काम करत आले आहे. त्यांची तळी उचलण्याचे काम कंबोज यांच्याकडे दिले असल्याची टिका शेख यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.

चुकीचा समज पसरविण्याची कुंबोजकडे सुपारी –

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तळागाळातील, सर्वसामान्य लोकांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे. पक्षातील प्रत्येक जण प्रामाणिकपणे जनतेची सेवा करतो. राष्ट्रवादीच्या पिंपरी-चिंचवड शहरातील वार्ड अध्यक्षासोबत देखील मोहित कंबोज यांची बरोबरी होणार नाही. तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजितदादांनी विकासात्मक दृष्टिकोन ठेऊन अनेक शहरांचा विकास केला. आमदार रोहितदादांनी बारामती ऍग्रोच्या माध्यमातून अनेक कुटुंबांना रोजगार निर्माण करून दिला. सर्व कामे नियमानुसार केली आहेत. असे असताना बारामती ऍग्रोबाबत चुकीचा समज पसरविण्याचे उद्योग आता रिकामटेकड्या मोहित कंबोज यांच्या हाती भाजपाने दिले आहे, असेही शेख म्हणाले.

चुकीचा आरोप कराल तर खरपूस समाचार घेऊ – शेख

स्वतः कर्तृत्व शून्य असलेल्या कंबोज यांनी मुंबई महापालिकेत साधा नगरसेवक होऊन दाखवावे, असे चॅलेंज शेख यांनी केले आहे. हिम्मत असेल तर त्यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये येऊन असे वक्तव्य करून दाखवावे. त्याला पळताभुई थोडी केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही युवक अध्यक्ष शेख यांनी दिला आहे. आमची संस्कृती ही तोडा फोडा आणि राज्य करा अशी नाही. कायद्याच्या मार्गाने आम्ही आंदोलने करतो. मात्र, राष्ट्रवादी आणि पवार परिवारावर कोणी खालच्या पातळीवर जाऊन टीका करणार असेल तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस त्याचा खरपूस समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात असू द्यावे, असेही इम्रानभाई शेख यांनी म्हटले आहे.