आरपीआयच्या महिला उपशहराध्यक्षा सुनिता गायकवाड यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

आरपीआयच्या महिला उपशहराध्यक्षा सुनिता गायकवाड यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

पिंपरी, ता. २० : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आरपीआय) महिला उपशहराध्यक्षा सुनिता केशव गायकवाड व कार्यकर्ता कांता दत्तु मोरे यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम व महिला शहराध्यक्षा सायली किरण नढे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यावेळी माजी नगरसेवक सद्गुरु कदम, विठ्ठल शिंदे, दहीतुले अण्णा, अर्जुन लांडगे, आकाश शिंदे, किरण नढे, जुबेर खान आदी उपस्थित होते.