सफाई कामगारांच्या वेतनावर ठेकेदारांचा “डल्ला”

सफाई कामगारांच्या वेतनावर ठेकेदारांचा "डल्ला"
संग्रहित छायाचित्र
  • किमान वेतनापासून महिला सफाई कामगार वंचितच; ठेकेदारांवर कारवाई कोण करणार?

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘फ’ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत झाडलोट सफाई कामगार महिला हे गेली १५ वर्षापासून कार्यरत आहेत, संबंधित ठेकेदाराकडून किमान वेतना नुसार पगार दिला जात नाही, त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार केला जात आहे, संबंधित ठेकेदाराने सर्व महिला कांमगारांचे ‘एटीएम’ कार्ड ठेकेदाराकडेच ठेवले आहेत, त्यामुळे झाडलोट करणारे सफाई महिला कामगार महिलांच्या वेतनावर ठेकेदार डल्ला मारत असुन सफाई कामगार महिलांची पिळवणूक केली जात आहे, उन्हातान्हात कबाड कष्ट करून देखील या महिलांना आपल्या हक्कापासून वंचित ठेवणाऱ्या ठेकेदारावर कारवाई कोण करणार असा सवाल बहुजन सम्राट सेना डॉ, बाबासाहेब आंबेडकर ग्रुपच्या वतीने उपस्थित केला जात आहे.

सफाई कामगारांच्या वेतनावर ठेकेदारांचा "डल्ला"

या कंत्राटी महिला कामगारांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. यामध्ये वेतनाचा प्रश्न, आरोग्याच्या सुविधा, पीएफची रक्कम व कायमस्वरूपी काम मिळणेबाबत समस्यांचा यामध्ये समावेश होतो, झाडलोट सफई कर्मचाऱ्यांना पुर्ण पगार देण्याऐवजी अर्धाच पगार दिला जात आहे, कामाचे तास अधिक होऊनही कमी पगार दिला जात आहे.

महापालिकेने पालिकेसाठी सेवा देणाऱ्या कामगारांना व सफाई कामगारांना किमान वेतनाचा दर लागू करण्यात आले आहे, त्यानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत क्षेत्रिय कार्यालयासाठी नियुक्त केलेल्या ठकेदारानां किमान वेतन निश्चिंत केले आहे, यासफाई कमगारांना मुळ वेतन २१ हजार रूपये आहे, मात्र शहरातील आरोग्य विभागाचे ठेकेदार महिलांना कर्मचाऱ्यांना ९ हजार देऊन त्यांची फसवणूक करीत आहे.

याबरोबरच अनेक कर्मचाऱ्यांचे ईसआय व पीएफची रक्कम देखील भरत नाहीत, विनाकारण कामावरून काढून टाकण्यात येते, ठेकेदार सफाई महिला कामगारांचे इंन्शुरंस काढत नाही, त्यामुळे झाडलोट करणाऱ्या सफाई कामगार महिलांना न्याय देणार तरी कोण ? असा सवाल उपस्थित होत आहे, त्वरित याबाबत निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करणार असा इशार झाडलोट करणारे सफाई कामगार महिलानी दिला आहे.

सफाई कामगारांना ठेकेदार किमान वेतन देत नाहीत, ठेकेदार कामगारांचे शोषण करीत आहेत, पीएफची रक्कम देखील भरत नाहीत, ठेकेदार कामगारांचे इंन्शुरंस काढत नाही, कामगारांना आजपर्यंतचा फरक मिळाला नाही, सफाई कामगार महिलांना वयाच्या ५८ व्या वर्षाच्या सेवेनिवृत्तीनंतर पेन्शन चालू करण्यात करण्यात यावे. असे कामगारांचे म्हणणे आहे.