Tag: crime news

PCMC : काळेवाडीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार
ताज्या घडामोडी, क्राईम

PCMC : काळेवाडीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

काँग्रेस शहराध्यक्षा सायली नढे यांच्या प्रयत्नामुळे नराधम गजाआड पिंपरी, दि. ५ सप्टेंबर २०२३ : एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घरी कोणी नसताना तीच्यावर वारंवार बलात्कार करणाऱ्या नराधमाला वाकड पोलीसांनी अटक केली. अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पिडीत मुलीच्या भावाने याबाबत आरोपीला जाब विचारला असता, आरोपीनेच तीच्या भावाला कोणाला काही सांगितल्यास हात पाय तोडण्याची धमकी दिली. याप्रकरणी पिडीतीच्या भावाने काँग्रेसच्या शहराध्यक्षा सायली नढे व सामाजिक कार्यकर्ते किरण नढे यांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर नढे दांपत्याने पिडीतीच्या भावाला वाकड पोलीस ठाण्यात घेऊन जात गुन्हा दाखल केला. सौरभ सुरेश चव्हाण (वय २१) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून वाकड पोलीसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, पिडीत मुलगी काळेवाडीत आ...
वारकरी लाठीचार्ज प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करा
पिंपरी चिंचवड

वारकरी लाठीचार्ज प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करा

काँग्रेस महिला शहराध्यक्षा सायली नढे यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी पिंपरी : आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थानावेळी पोलीसांकडून वारकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला असून हा गंभीर प्रकार आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी. अशी मागणी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा सायली किरण नढे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांकडे केली आहे. काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या मार्गदर्शनाखाली सायली नढे यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी स्वाती शिंदे, चिंचवड विधानसभा महिला अध्यक्षा निर्मला खैरे, शबाना शेख, महिला शहर उपाध्यक्षा आशा भोसले, रंजना सौदेकर आदी उपस्थित होत्या. Pimpri Chinchwad Police Commissioner यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जगद्गुरू संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) व...
PIMPRI CHINCHWAD : रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला अंमली विरोधी पथकाने ठोकल्या बेड्या; १ गावठी पिस्टल आणि १ जीवंत काडतुस केले जप्त
क्राईम

PIMPRI CHINCHWAD : रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला अंमली विरोधी पथकाने ठोकल्या बेड्या; १ गावठी पिस्टल आणि १ जीवंत काडतुस केले जप्त

पिंपरी (लोकमराठी न्यूज) : पोलीस (PCPC) रेकॉर्ड वरील एका सराईत गुन्हेगाराला पिंपरी चिंचवड अंमली विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. या गुन्हेगाराकडुन ०१ गावठी बनावटीचे पिस्टल आणि ०१ जीवंत काडतुस पथकाने जप्त केले आहे. या गुन्हेगारावर १६ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असुन तडीपारीची कारवाई देखील त्याच्यावर करण्यात आली आहे. विशाल शहाजी कसबे असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ आधिकारी यांच्या सुचना प्रमाणे अंमली विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार हे वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीत बुधवार (ता.७) रोजी पेट्रोलींग करीत असताना पथकातील पोलीस अंमलदार संदिप पाटील व अशोक गारगोटे यांना माहीती मिळाली की, पोलीस रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार विशाल कसबे हा वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीत काळाखडक येथील पाण्याच्या टाकी जवळ थांबलेला असुन त्याच्या जवळ पिस्टल आहे. मिळालेल...
या कारणासाठी केला मित्राचा गोळ्या झाडून खून
क्राईम

या कारणासाठी केला मित्राचा गोळ्या झाडून खून

पिंपरी चिंचवड : चिखली मध्ये एका मित्राने त्याच्या साथीदारासोबत मिळून मित्राला गोळ्या घालून ठार मारले. ही घटना सोमवारी (दि. 22) दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास घडली. या खुनाचे कारण अगदी क्षुल्लक आहे. मित्राची प्रतिष्ठा वाढू लागल्याने हा खून झाल्याचे समोर आले आहे. कृष्णा उर्फ सोन्या हरिभाऊ तापकीर (वय 21, रा. महादेवनगर, चिखलीगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे मामा राजेंद्र कैलास कार्ले (वय 38, रा. चांदूस, ता. खेड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सौरभ उर्फ सोन्या पानसरे, सिद्धार्थ कांबळे (दोघे रा. फलकेवस्ती, मोईगाव, ता. खेड) आणि त्यांचे इतर साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी नवरात्रीच्या उत्सवात विकास साने यांनी पाटीलनगर चिखली येथील मैदानावर दांडिया कार्यक्रम आयोजित केला होता....