सामाजिक

शिवशाही व्यापारी संघाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी स्वप्निल शेलार यांची निवड
सामाजिक

शिवशाही व्यापारी संघाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी स्वप्निल शेलार यांची निवड

पुणे : शिवशाही व्यापारी संघाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी स्वप्निल जयवंत शेलार यांची निवड करण्यात आली. याबाबत संघाचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. शिवशाही व्यापारी संघाचे प्रदेशाध्यक्ष धनंजय ढावरे यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हाध्यक्षपदी शेलार यांची निवड मध्यवर्ती कार्यालय मुंबई या ठिकाणाहून संस्थापक-अध्यक्ष दाखले यांनी जाहीर केली. नवनियुक्त जिल्हाध्यक्षांनी सर्वसामान्य जनतेच्या, कलाकार बांधवांच्या व व्यापारी बांधवांच्या प्रश्नावर वाचा फोडण्यासाठी सदैव कटिबध्द राहण्याच्या सूचना देऊन पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी दाखले यांनी शुभेच्छा दिल्या. ...
‘नातं विश्वासाचे’ क्लबच्या युवकांची तुकाराम महाराजांच्या आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात ‘प्लास्टिक मुक्त वारी’ 
पुणे, सामाजिक

‘नातं विश्वासाचे’ क्लबच्या युवकांची तुकाराम महाराजांच्या आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात ‘प्लास्टिक मुक्त वारी’

दिवे घाट, पुणे (लोकमराठी न्यूज) : 'प्लस्टिक मुक्त वारी ' या उपक्रमांतर्गत " नातं विश्वासाचे " या क्लब ने आयोजित केलेल्या स्वच्छता मोहिमेत तळेगाव येथील नूतन कॉलेज ऑफ इंजिनिरिंग व रिसर्च मधील NSS च्या स्वयंसेवकांना सहभागी होण्याची संधी मिळाली. “नातं विश्वासाचे”क्लब व एन एस एस (नूतन कॉलेज ऑफ इंजिनीरिंग आणि रिसर्च )च्या एकूण ८० युवकांच्या व ८ शिक्षकांच्या समूह तुकाराम महाराजांच्या आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाले. खरं तर जास्त करून सर्वांची ही पहिलीच वारी पण ३२ किलोमीटर चा प्रवास सर्वांनी सुखरूप पणे पूर्ण केली. दोन्ही पालखी चे दर्शन घेत पुणे स्टेशन पासून सासवड पर्यंतची ३२ किलोमीटर ची पाय वारी पूर्ण केली. त्यात सर्वात कठीण टप्पा मानला जाणाऱ्या ४ किलोमीटर चा दिवे घाट सर्व ८० विद्यार्थ्यांनी पूर्ण केला. दिवे घाटात सर्व विध्यार्थ्यांनि एकूण १०८ पोती ,...
पोलीस सारथीच्या काळेवाडी रहाटणी विभाग युवकाध्यक्षदी छगन जायभाये यांची नियुक्ती 
सामाजिक

पोलीस सारथीच्या काळेवाडी रहाटणी विभाग युवकाध्यक्षदी छगन जायभाये यांची नियुक्ती

पिंपरी चिंचवड : पोलीस सारथी सामाजिक संस्थेच्या काळेवाडी रहाटणी विभागाच्या युवकाध्यक्षपदी छगन पोपट जायभाये यांची नियुक्ती करण्यात आली. याबाबत (Police Sarathi) संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शहाजी अंकुशराव भोसले यांनी जायभाये यांना नियुक्तीपत्र दिले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रसिद्ध गायक मिलिंद शिंदे यांचा प्रमोद गायकवाड यांच्या वतीने सन्मान
सामाजिक

प्रसिद्ध गायक मिलिंद शिंदे यांचा प्रमोद गायकवाड यांच्या वतीने सन्मान

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क भोसरी ता. १६ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संघर्ष प्रतिष्ठान यांच्या वतीने प्रसिद्ध गायक मिलिंद शिंदे यांचा भारदार गायनाचा कार्यक्रम भोसरी या ठिकाणी आयोजित केला होता. या कार्यक्रमाला मिलिंद शिंदे आले असता मानव सुरक्षा सेवा संघाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांच्या वतीने मिलिंद शिंदे यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी संघर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आयोजक संघर्ष प्रतिष्ठान भोसरी अध्यक्ष नितीलेश, बंटी, शत्रुघन डोळस, मच्छिंद्र राखपसरे तसेच संघर्ष प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी परिसरातील नागरिक आणि भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ...
चाफनाथ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
सामाजिक

चाफनाथ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी

चाफनाथ : माता रमाई यांची जयंती मौजे चाफनाथ येथे उत्साहात साजरी करण्यात आली. नांलदा बुद्ध विहार सभासदांच्या वतीने माता रमाई जयंती निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. पूर्व संध्येला प्रवचनकार गुलाबराव अहिरे यांचे प्रवचन झाले. जयंतीच्या दिवशी सकाळी पंचशील ध्वजारोहण गुलाबराव अहिरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर संपूर्ण बुद्ध वंदना घेण्यात आली व माता रमाई (Mata Ramai) यांच्या जीवनावर प्रवचन देण्यात आले. या कार्यक्रमाचा समस्त बौद्ध अनुयायी उपस्थित राहुन आस्वाद घेतला. हा कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर बलखंडे, नामदेव बलखंडे, भानुदास बलखंडे, मनोहर पुंडगे, पुष्पा पुंडगे, लता रामजी बलखंडे, कपील बलखंडे यांनी परिश्रम घेतले. ...
प्रबुद्ध संघातर्फे चिंचवडगाव येथे प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा 
सामाजिक

प्रबुद्ध संघातर्फे चिंचवडगाव येथे प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा

चिंचवडगाव : प्रबुद्ध संघाच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त मेजर शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी बोलताना मेजर शिंदे यांनी युद्धामधील काही प्रसंग सांगितले. " देश एक संघ राहण्यासाठी आपल्याकडे संविधान लाख मोलाचं आहे, ख-या अर्थाने लोकशाही ही जगात जर श्रेष्ठ असेल तर संविधानामुळेच आहे. असे मेजर शिंदे आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. या वेळी प्रदिप पवार, पारबत गुरूजी, डॉ. धर्मेंद्र रामटेके यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला माजी नगरसेवक सुरेश भोईर, मधुकर बच्चे यांच्यासह बहूसंख्य नागरिक व प्रबुद्ध संघाचे पदाधिकारी, सभासद उपस्थित होते. सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रबुद्ध संघाचे सचिव किशन बलखंडे यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिंगबर घोडके, राजू वासनिक, दिलीप गोडबोले यांनी सहकार्य केले. ...
संत शिरोमणी श्री सावता महाराज मंदिर उभारणीसाठी ५१ हजार रुपयांची देणगी 
पिंपरी चिंचवड, सामाजिक

संत शिरोमणी श्री सावता महाराज मंदिर उभारणीसाठी ५१ हजार रुपयांची देणगी

पिंपरी : विजयादशमी व धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त समस्त बहुजन समाजाच्या वतीने संत शिरोमणी श्री सावता महाराज मंदिर उभारणीसाठी ५१ हजार रुपयांची देणगी देण्यात आली. काळेवाडीतील युवानेते बाबासाहेब जगताप यांच्या सहकार्याने संत शिरोमणी श्री सावता महाराज प्रतिष्ठान यांना बांधकामसाठी लागणारे मटेरियल आणि रोख रक्कम सहीत रु ५१००० हजार रूपयांची देणगी समस्त बहुजन समाजाच्या वतीने देण्यात आली. ही देणगी समाजप्रबोधनकार शारदा मुंढे यांच्या हस्ते प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुखदेव खेडकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. त्यावेळी प्रहार पक्षाचे नेते संजय गायके, सामाजिक नेत्या रेखा काटे, रहाटणी गावचे सामाजिक नेते तात्या शिंगारे, दिलीप पवार, मनोज जाधव, विलास पवार, सिताराम जगताप, पंकज पवार, अरुण मैराळे, अनिल मखरे, निलेश भोसले, रंगनाथ भुजबळ, कोंडीबा कुटे, बापु काटे, सचिन पार्टे आदी उपस्थित होते. बाबासाहेब ...
बार्टी तर्फे बेघर ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी 
पुणे, सामाजिक

बार्टी तर्फे बेघर ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी

पुणे : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. पिंपरीतील जिजामाता रूग्णालयासोबत आयोजन केलेल्या या शिबिरात सावली बेघर नागरिक निवारा येथे ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यावेळी जिजाऊ रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिता साबळे, डॉ. गणेश तागडे व डॉ. स्नेहा जगदाळे, फार्मासिस्ट दूधमल जाधव, लॅब टेक्निशियन प्रीती सनगर व त्यांचे सहकारी स्टाफ तसेच आशा वर्कर, हाॅस्पीटल कर्मचारी व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे (Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute) यांचे समतादूत संगीता शहाडे, प्रशांत कुलकर्णी यांनी अथक प्रयत्न करून ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिरचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. या शिबिराचा ५५ ज्येष्ठ नागरिकांनी लाभ ...
पिंपळे सौदागरमधील महापालिका दवाखान्याचा विस्तार करा – विशाल जाधव
पिंपरी चिंचवड, सामाजिक

पिंपळे सौदागरमधील महापालिका दवाखान्याचा विस्तार करा – विशाल जाधव

पिंपळे सौदागर, ता. 30 : येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा दवाखाना रूग्ण संख्या विचारात घेता अपुरा पडत आहे. तोकड्या जागेमुळे कर्मचाऱ्यांसह रूग्णांचेही मोठे हाल होतात. त्यामुळे लवकरात लवकर या दवाखान्याचा विस्तार करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विशाल जाधव यांनी केली आहे. याबाबत जाधव यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपळे सौदागर, रहाटणी, पिंपळे गुरव भागातील जवळजवळ एक ते दिड लाख लोकसंख्या असलेल्या भागातुन लोक उपचार घेण्यासाठी या दवाखान्यात येतात. दररोज किमान १०० ते १५० रुग्ण ओपीडीची सेवा घेतात. संपुर्ण भागात राष्ट्रीय रूग्ण सेवकांचा कार्यक्रम राबविण्यात येतो. तसेच बालक लसीकरण मोहीमही यशस्वीपणे राबविण्यात येते. क्षयरोग तपासणी, निदान व उपचार त्याच ठिकाणी केले जातात. परिणामी रुग्ण संख्या रोजच वाढत असते. सर्व रुग्णांची आवश्यकतेनुसार रक्त तपासणी, ...
विजयराव पाठक स्मृती मंचातर्फे संभाजीनगरमध्ये रक्तदान शिबीर
सामाजिक

विजयराव पाठक स्मृती मंचातर्फे संभाजीनगरमध्ये रक्तदान शिबीर

पिंपरी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संभाजीनगर येथील स्वयंसेवक स्व. विजयराव गोविंदराव पाठक यांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त श्री विठ्ठल मंदिर शाहूनगर येथे स्व विजयराव पाठक स्मृती मंच तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ५५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्याप्रसंगी संघाचे जिल्हा संघचालक विनोद बन्सल, गटाचे संघचालक नरेंद्र गुप्ता, जिल्हा कार्यवाह महेश्वर मराठे, जिल्हा सहकार्यवाह अमोल देशपांडे, उमेश कुटे, गटाचे कार्यवाह सचिन ढोबळे, तसेच माजी नगरसेवक केशव घोळवे, योगिता नागरगोजे, अनुराधा गोरखे, शिव शंभू प्रतिष्ठान अध्यक्ष संजय तोरखेदे व इतर सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीराम कुलकर्णी यांनी केले व आभार प्रदर्शन किशोर माने यांनी केले. ...