संत शिरोमणी श्री सावता महाराज मंदिर उभारणीसाठी ५१ हजार रुपयांची देणगी

संत शिरोमणी श्री सावता महाराज मंदिर उभारणीसाठी ५१ हजार रुपयांची देणगी 

पिंपरी : विजयादशमी व धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त समस्त बहुजन समाजाच्या वतीने संत शिरोमणी श्री सावता महाराज मंदिर उभारणीसाठी ५१ हजार रुपयांची देणगी देण्यात आली.

काळेवाडीतील युवानेते बाबासाहेब जगताप यांच्या सहकार्याने संत शिरोमणी श्री सावता महाराज प्रतिष्ठान यांना बांधकामसाठी लागणारे मटेरियल आणि रोख रक्कम सहीत रु ५१००० हजार रूपयांची देणगी समस्त बहुजन समाजाच्या वतीने देण्यात आली.

ही देणगी समाजप्रबोधनकार शारदा मुंढे यांच्या हस्ते प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुखदेव खेडकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. त्यावेळी प्रहार पक्षाचे नेते संजय गायके, सामाजिक नेत्या रेखा काटे, रहाटणी गावचे सामाजिक नेते तात्या शिंगारे, दिलीप पवार, मनोज जाधव, विलास पवार, सिताराम जगताप, पंकज पवार, अरुण मैराळे, अनिल मखरे, निलेश भोसले, रंगनाथ भुजबळ, कोंडीबा कुटे, बापु काटे, सचिन पार्टे आदी उपस्थित होते.

बाबासाहेब जगताप म्हणाले की, मंदिर उभारणीसाठी देणगी देण्यात आली असून पुढे सभामंडप बांधकामासाठी बहुजन समाजाच्या वतीने देणगी देण्यात येणार आहे. तसेच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ग्रंथालय काळेवाडी रहाटणी भागात सुरू केले जाणार आहे. त्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेकडे मागणी करणार आहे. यापुढे बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण एकमेकांना साह्य करू. असे आश्वासन बाबासाहेब जगताप यांनी दिले.