महापालिकेच्या सर्व रुग्णालयात बालकांना नवजात बालकाचे(NICU) अतिदक्षता विभाग सुरू करा : आप

महापालिकेच्या सर्व रुग्णालयात बालकांना नवजात बालकाचे(NICU) अतिदक्षता विभाग सुरू करा : आप
  • शहरातील पाच रुग्णालयामध्ये एनआयसीयु युनिट तातडीने सुरू करणार – सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण पांडुंरंग गोफणे यांचे आश्वासन

पिंपरी चिंचवड : मनपाच्या विविध रुग्णालयात लोकसंख्येच्या प्रमाणात वैद्यकीय सुविधा अपुऱ्या आहेत. मनपाच्या (PCMC) रुग्णालयात बाळंतपण विनामूल्य असल्याने अनेक गरजू,गरीब व श्रमिक रुग्णालयाकडे नागरिकांचा लोंढा जास्त आहे. त्यामुळे येथील मुख्य रुग्णालयात प्रसूतिगृहमध्ये नवजात शिशु अतिदक्षता विभाग तातडीने सुरू करावे,अशी मागणी आम आदमी पार्टीचे (Aam Aadmi Party) कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी मनपा आयुक्त शेखर सिंह यांचे कडे केली आहे.आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाण मनपाच्या प्रवेश द्वारासमोर निदर्शने करण्यात आली.

चेतन बेंद्रे बोलताना म्हणाले की (Chetan Bendre), नवजात बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी तसेच प्रसुतीपश्चात बाळाला योग्य सुविधा मिळण्यासाठी नवजात शिशु अतिदक्षता विभागात हायटेक सुविधा मिळाल्या पाहिजेत. प्रसूतिगृहमधील बाळंतणानंतरची कमी वजनाची किंवा अत्यवस्थ बालके वाय सी एम मध्ये पाठवली जातात,तेथे पुरेसे एनआयसीयू नसल्याने डॉक्टर खाजगी रुग्णालयात बाळाला पाठवण्याचा सल्ला देतात. खाजगी आय सी यु ची अफाट बिले गरीब रुग्ण भरू शकत नाही,ती बिले मनपाने भरावीत,अशी मागणी बेंद्रे यांनी केली आहे. सामान्य तसेच गरीब कुटुंबियांना खाजगी दवाखान्याचा खर्च पेलवणे शक्य होत नाही. परिणामी अनेकदा उपचाराअभावी नवजात बालकांना जीव गमावण्याची शक्यता नाकारता येत नाही

आपचे डॉक्टर आघाडीचे शहरप्रमुख डॉ. योगेश बाफना यांनी सांगितले की, नवजात बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी खामगाव येथील सामान्य रूग्णालयात नवजात शिशु अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला आहे. या विभागात खाजगी दवाखान्याच्या तुलनेत हायटेक सुविधा मिळत आहेत. नवजात कमी वजनाची बाळ जन्माला आल्यास अथवा गंभीर आजार असल्यास त्याच्या जीवाला धोका संभवू शकतो. प्रसुतीपश्चात बाळाला झटके येणे, बाळाच्या श्वासाची गती जलद चालणे, बाळ स्तनपान करीत नसेल, बाळाला कावीळ, धर्नुवात तसेच जंतु संसर्गापासून संरक्षण करण्यासाठी पालिकेच्या सामान्य रूग्णालयात अत्याधुनिक नवजात शिशु अतिदक्षता विभाग कार्यान्वित करणे गरजेचे आहे.

“आप’चे यलप्पा वालदोर यांनी प्रशासनाच्या आरोग्य विभागावर टीका करताना सांगितले की,मनपाचे सात हजार कोटीचे बजेट आहेत,त्यातील किमान 10 टक्के रक्कम आरोग्य व वैद्यकीय सुविधा अंतर्गत आधुनिक उपकरणे,आयसीयू,एनआयसीयू आणि यंत्रणा सक्षम करण्यासाठी वापरले पाहिजेत.औद्योगिक शहरातील अल्प उत्पन्न गटातील छोटे व्यावसायिक,घरेलू कामगार,रिक्षाचालक,पथविक्रेते,कंत्राटी कामगार यांची शहरात मोठी लोकसंख्या आहे.मनपाच्या कुटुंब कल्याण ,बालसंगोपन धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणी साठी बालमृत्यू होऊ नये यासाठी प्रत्येक रुग्णालयात बालकासाहित सर्व अत्यवस्थ रुग्णांना अतिदक्षता विभागाची सुविधा वाढवावी.अशी मागणी करण्यात आली.

मनपाचे सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.लक्ष्मण गोफणे यांना दिलेल्या निवेदनात आम आदमी पार्टीच्या प्रमुख मागण्या सादर करण्यात आल्या.

1. पिंपरी चिंचवड मनपा हद्दीतील यशवंतराव चव्हाण मेमोरियल (ycm) व्यतिरिक्त सर्व मुख्य रुग्णालयांमध्ये सर्व सुविधांसोबत NICU सुरु करण्यात यावे.

2. आकुर्डी, थेरगाव रुग्णालयांमध्ये NICU मध्ये व्हेंटिलेटर आणि इतर सर्व सुविधा सुरु करण्यात याव्यात.

3. मनपा रुग्णालयात जर गरोदर माता ने बालकाला जन्म दिला आणि नवजात बालकाला NICU ची गरज लागली आणि पालिका त्याची व्यवस्था करू शकली नाही तर पिंपरी चिंचवड मनपा ने खाजगी रुग्णालयात येणारा सगळा खर्च करावा. त्यासाठी नवीन धोरण तयार करण्यात यावे. डॉ.गोफणे यांनी आश्वासन दिले की,शिश्यू अतिदक्षता विभाग शहरातील पाच रुग्णालयात तातडीने सुरू करू असे आश्वासन शिष्टमंडळास दिले.चेतन बेंद्रे,राज चाकणे,यलप्पा वालदोर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निदर्शनांमध्ये डॉ.योगेश बाफना, डॉ. संतोष गायकवाड,डॉ. जाधव, ज्योती शिंदे, ब्रम्हानद जाधव, यशवंत कांबळे, मंगेश आंबेकर, स्वप्निल जेवळे,सरोज कदम,नाजनीन मेनन,शिवम यादव,सुरेश भिसे,गोविंद माळी,आशुतोष शेळके,सायली केदारी,कल्याणी राऊत,मीनाताई जावळे,मैमुना शेख, पूनम गीते, बाजीराव बाणखेले, सुरेंद्र कांबळे, मोतीराम अगरवाल, महेश गायकवाड, चंद्रमणी जावळे, अशोक नांगरे, महेश गायकवाड, adv महेंद्रकुमार गायकवाड, संजय मोरे, संतोष बागाव इ नी भाग घेतला.