चाफनाथ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी

चाफनाथ : माता रमाई यांची जयंती मौजे चाफनाथ येथे उत्साहात साजरी करण्यात आली. नांलदा बुद्ध विहार सभासदांच्या वतीने माता रमाई जयंती निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. पूर्व संध्येला प्रवचनकार गुलाबराव अहिरे यांचे प्रवचन झाले. 

जयंतीच्या दिवशी सकाळी पंचशील ध्वजारोहण गुलाबराव अहिरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर संपूर्ण बुद्ध वंदना घेण्यात आली व माता रमाई (Mata Ramai) यांच्या जीवनावर प्रवचन देण्यात आले. या कार्यक्रमाचा समस्त बौद्ध अनुयायी उपस्थित राहुन आस्वाद घेतला. हा कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर बलखंडे, नामदेव बलखंडे, भानुदास बलखंडे, मनोहर पुंडगे, पुष्पा पुंडगे, लता रामजी बलखंडे, कपील बलखंडे यांनी परिश्रम घेतले.