पिंपरी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संभाजीनगर येथील स्वयंसेवक स्व. विजयराव गोविंदराव पाठक यांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त श्री विठ्ठल मंदिर शाहूनगर येथे स्व विजयराव पाठक स्मृती मंच तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ५५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
त्याप्रसंगी संघाचे जिल्हा संघचालक विनोद बन्सल, गटाचे संघचालक नरेंद्र गुप्ता, जिल्हा कार्यवाह महेश्वर मराठे, जिल्हा सहकार्यवाह अमोल देशपांडे, उमेश कुटे, गटाचे कार्यवाह सचिन ढोबळे, तसेच माजी नगरसेवक केशव घोळवे, योगिता नागरगोजे, अनुराधा गोरखे, शिव शंभू प्रतिष्ठान अध्यक्ष संजय तोरखेदे व इतर सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीराम कुलकर्णी यांनी केले व आभार प्रदर्शन किशोर माने यांनी केले.