पत्रकार दिनानिमित्त व्हॉईस ऑफ मीडिया रिसोडच्या वतीने विविध उपक्रम

रिसोड (शंकर सदार) : – सहा जानेवारी या दिवशी महाराष्ट्रात पत्रकार दिन साजरा केला जातो. 1832 साली याच दिवशी बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ वृत्तपत्राला सुरुवात केली होती. त्यानिमित्ताने व्हॉईस ऑफ मीडिया रिसोडच्या वतीने 5 जानेवारी रोजी पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर, जेष्ठ पत्रकारांचा सत्कार आदी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

रिसोड येथील पत्रकार कार्यालयात सदर कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती व्हॉईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष विनोद पाटील बोडखे यांनी दिली आहे.
तसेच यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसिलदार प्रतिक्षा तेजनकर भूषविणारआहेत.तरबाजार समितीचे सभापती संजय शिंदे, गट विकास अधिकारी प्रमोद बदरखे, ठाणेदार देवेंद्र सिंह ठाकुर, रजिस्ट्रार अधिकारी श्री सोनवणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री चिंचोले, पोलीस उपनिरक्षक अशोकराव गिते आदिंची उपस्थिती राहणार आहे.


व्हॉईस ऑफ मीडिया ही पत्रकारिता व पत्रकार यांच्या हितासाठी झटणारी देशातील सर्वात मोठी पत्रकारांची संघटना आहे. सदर संघटनेच्या नियोजनानुसार व्हॉईस ऑफ मीडिया रिसोड तालुक्याच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये पत्रकार व त्यांच्या परिवारातील सर्व सदस्यांची आरोग्य तपासणी, पत्रकारितेत मोठे योगदान देणारे जेष्ठ पत्रकार तसेच सामाजिक क्षेत्रात एक वेगळा आदर्श निर्माण केलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच ज्या पत्रकारांच्या मुलांनी विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवले आहे, अशा पाच मुलांचा व त्यांच्या आई, वडिलांचा सन्मान आणि गौरव करण्यात येणारआहे.शिवायतालुका व गाव पातळीवरील उत्कृष्ट काम करणाऱ्या पदाधिकारी यांचा सुद्धा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती व्हॉईस ऑफ मीडियाचे रिसोड तालुकाध्यक्ष बोडखे यांनी दिली आहे.

पत्रकार दिनानिमित्त व्हॉईस ऑफ मीडिया रिसोडच्या वतीने विविध उपक्रम