राष्ट्रीय

National News Marathi

महाराष्ट्रातल्या तीन महिलांना ‘नारी शक्ती पुरस्कार’; राष्ट्रपतींच्या हस्ते होणार ८ मार्च रोजी सन्मानित
राष्ट्रीय

महाराष्ट्रातल्या तीन महिलांना ‘नारी शक्ती पुरस्कार’; राष्ट्रपतींच्या हस्ते होणार ८ मार्च रोजी सन्मानित

नवी दिल्ली, 7 दिल्ली : विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एकूण 28 महिलांना ‘नारीशक्ती पुरस्कार’ जाहीर झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तीन महिलांचा समावेश आहे. हे पुरस्कार वर्ष 2020 व 2021 साठीचे आहेत. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्यावतीने ‘नारीशक्ती पुरस्कारा’ची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये कथक नृत्यांगना डाऊन सिंड्रोमप्रभावित सायली आगवणे, वनिता बोराडे या पहिल्या महिला सर्पमित्र यांना वर्ष 2020 साठी तर वर्ष 2021 साठी सामाजिक उद्योजिका कमल कुंभार यांना जाहीर झाला आहे. मंगळवारी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्यादिवशी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन येथे आयोजित कार्यक्रमात या पुरस्काचे वितरण करण्यात येणार आहे. कोविड महासाथीमुळे वर्ष 2020 च्या पुरस्कारांचे वितरण होऊ शकले नाही. 8 मार्च रोजी वर्ष 2020 आणि 2...
ओबीसी आरक्षण : सर्वोच्च न्यायालयाने राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल फेटाळला
मोठी बातमी, राष्ट्रीय

ओबीसी आरक्षण : सर्वोच्च न्यायालयाने राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल फेटाळला

नवी दिल्ली : महाराष्ट्र पंचायत निवडणुकीत - सर्वोच्च न्यायालयाने 27 टक्के ओबीसी आरक्षण नाकारले आहे. महाराष्ट्र मागासवर्ग आयोगाच्या अंतरिम अहवालाच्या आधारे राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाने कोणतेही पाऊल उचलू नये, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. हा अहवाल योग्य अभ्यास न करता तयार करण्यात आल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. आता पुढच्या आदेशापर्यंत ओबीसी आरक्षण नसेल असा निर्वाळा न्यायालयाने दिला आहे. आज याविषयीची सुनावणी झाली आहे. त्रुटी राहील्याने सर्वोच्च न्यायालयाने राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय होणार महापालिका निवडणुका होणार का अशी परिस्थिती सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून दिसून येत आहे. ओबीसी आरक्षण लागू करण्यासाठी जानेवारी महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते की, मागासवर्ग आयोगाने याबद्दलचा निर्णय घ्...
कोरोनाचा नवीन स्ट्रेन देशात प्रवेश करू नये, याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे
मोठी बातमी, आरोग्य, राष्ट्रीय

कोरोनाचा नवीन स्ट्रेन देशात प्रवेश करू नये, याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे

डॉ. प्रकाश कोयाडे गेल्या दोन दिवसांत कोविड संबंधित अचानक बातम्या येऊ लागल्या आहेत. तिसऱ्या लाटेबद्दल चर्चा होऊ लागली आहे. कोरोनाबद्दल सोशल मीडिया आणि टीव्ही वरील सुरू झालेल्या चर्चेवरून समज-गैरसमज आणि अफवांचं पीक उठणार आहे. एक भीतीचं वातावरण तयार होऊन येत्या आठवड्याभरात आपण पॅनिक अवस्थेत जाऊ की काय अशी परिस्थिती येण्याच्या मार्गावर आहे. कोरोनाचा नवीन स्ट्रेन 'Omicron चे दोन रुग्ण बेंगलोरमध्ये सापडले असून ते दक्षिण आफ्रिकेचे रहिवासी आहेत. त्यांचे अजून काही रिपोर्ट यायचे बाकी आहेत. नेमके किती म्युटेशन झाले आहे याबद्दल माहिती येणं बाकी आहे. सध्यातरी एकाही भारतीयांमध्ये हा विषाणू सापडला नाही. या स्ट्रेन बद्दल बरेच तर्क-वितर्क सुरू आहेत. लक्षणं असणार नाहीत, नाक-घशात हा विषाणू प्रकार सापडत नाही डायरेक्ट फुफ्फुसात जातो, शेवटच्या टप्प्यात आल्यानंतरच हा डिटेक्ट होतो वगैरे चर्चा सुरू...
मध्यप्रदेश शासनातर्फे इंदोरमध्ये शुद्ध मराठी अभिव्यक्ती कार्यशाळा उत्साहात
मोठी बातमी, राष्ट्रीय

मध्यप्रदेश शासनातर्फे इंदोरमध्ये शुद्ध मराठी अभिव्यक्ती कार्यशाळा उत्साहात

लोकमराठी न्यूज नेटवर्क इंदोर : मध्यप्रदेश शासनाच्या मराठी साहित्य अकादमी आणि मुक्त संवाद साहित्यिक समिती, इंदोर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता. १४ नोव्हेंबर) इंदोर येथे मराठी भाषकांसमोर 'शुद्ध मराठी अभिव्यक्ती' या विषयावर कार्यशाळा झाली. या कार्यशाळेत सहभागी मराठी भाषकांना मार्गदर्शन करण्यासाठी पुण्याहून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह, अक्षरभारतीचे अध्यक्ष व पुण्यातील मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे उपाध्यक्ष माधव राजगुरू यांना पाचारण करण्यात आले होते. महाराष्ट्रापासून दूर अमराठी प्रांतात जिथे हिंदी भाषेचा प्रभाव आहे, अशा वातावरणात राहणाऱ्या मराठी भाषकांचा प्रतिसाद आणि प्रतिक्रिया पाहून ही कार्यशाळा त्यांच्यासाठी एकप्रकारची पर्वणीच होती, असे जाणवले. गेली अनेक वर्षे म्हणजे जवळजवळ ११ वर्षे मुक्त संवादच्या माध्यमातून मराठी बांधवांसाठी अशा प्रकार...
सासू व पत्नीची हत्या करणाऱ्या घरजावयाला पोलिसांनी केली अटक
ताज्या घडामोडी, राष्ट्रीय

सासू व पत्नीची हत्या करणाऱ्या घरजावयाला पोलिसांनी केली अटक

नवी दिल्ली : घरजावई झाल्याचे सासू-सासरे टोमणे मारत असत. दररोजच्या या टोमणे आणि कुचकट बोलण्याला वैतागूनच घरजावयाने पत्नी आणि सासूचा खून केला. त्याने गोळी झाडल्यामुळे पत्नी व सासूचा जागेवरच मृत्यू झाला. राजधानी दिल्लीत ही धक्कादायक घटना घडली आहे. बाबा असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हरीदास नगर येथे आपल्या पत्नीसह सासू-सासऱ्यांकडेच आरोपी राहत होता. त्यावरुन, घरजावई झालेल्या बाबा यांस सासू-सासरे टोमणे मारत असत. दररोजच्या या टोमणे आणि कुचकट बोलण्याला वैतागूनच आरोपीने पत्नी आणि सासूचा खून केला. विशेष म्हणजे आरोपीने स्वत: फोन करुन घडलेली घटना पोलिसांना सांगितली. त्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवले. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपी बाबाला अटक केली आहे....
‘सीएए-एनआरसी’ आंदोलनाप्रमाणे शेतकरी आंदोलनातून देश अस्थिर करण्याचा देशविरोधी शक्तींचा डाव – कपिल मिश्रा
राष्ट्रीय

‘सीएए-एनआरसी’ आंदोलनाप्रमाणे शेतकरी आंदोलनातून देश अस्थिर करण्याचा देशविरोधी शक्तींचा डाव – कपिल मिश्रा

मुंबई : पुर्वीच्या सरकारच्या काळात थेट आतंकवादी आक्रमणे करून वा बाँबस्फोट घडवून देशात अस्थिरता माजवता येत होती. आता तसे थेट करता येत नसल्यामुळे देशविरोधी शक्तींनी सी.ए.ए. (नागरिकत्व सुधारणा कायदा) आणि एन्.आर्.सी. (राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी) यांच्या वेळी शाहिनबागसारखी आंदोलने केली आणि नंतर हिंसक दंगली घडवल्या. आता तोच प्रकार शेतकरी आंदोलनाला माध्यम बनवून चालू आहे. दिल्लीनंतर देशभरातील अन्य राज्यांत अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे. या मागे खलिस्तानी संघटना आणि अन्य देशविरोधी शक्ती कार्यरत आहेत; पण त्यांनी हे लक्षात घ्यावे की ज्याप्रमाणे दिल्लीतील दंगलीनंतर सर्व दोषींवर कारवाईचे सत्र चालू झाले. तसे शेतकरी आंदोलनाच्या वेळी कोणी देशात अस्थिरता माजवण्याचा प्रयत्न केला, तर सरकारद्वारे कठोर कारवाई होऊ शकते, असे वक्तव्य भाजपचे नवी दिल्ली येथील नेते तथा माजी आमदार श्री. कपिल मिश्र य...
मोठी बातमी, राष्ट्रीय

भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा यांचे वादग्रस्त वक्तव्य | म्हणाल्या शुद्राला शुद्र म्हटलं तर…

एएनआय : भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. साध्‍वी प्रज्ञा यांनी मध्‍य प्रदेश मधील सीहोर येथे एका कार्यक्रमात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निशाणा साधताना त्यांच्याबद्दल अपशब्दाचा वापर केला. प्रज्ञा म्हणाल्या की, ‘क्षत्रियला क्षत्रिय म्हटलं तर वाईट वाटत नाही. ब्राह्मणला ब्राह्मण म्हटलं तर वाईट वाटत नाही. वैश्‍याला वैश्‍य म्हटलं तर वाईट वाटत नाही. मात्र, शुद्राला शुद्र म्हटलं तर वाईट वाटत. कारण काय आहे? हे समजत नाही. या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओही समोर आला आहे. https://twitter.com/ANI/status/1337878315873366016?s=19 याबरोबरच त्यांनी बीजेपी अध्‍यक्ष जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना ममता बॅनर्जी यांचावर निशाना साधताना म...
आंध्र प्रदेशातून चक्रीवादळ कर्जत-जामखेडमार्गे चाललं मुंबईला
मोठी बातमी, राष्ट्रीय

आंध्र प्रदेशातून चक्रीवादळ कर्जत-जामखेडमार्गे चाललं मुंबईला

अहमदनगर : पुढील दोन दिवसांत बंगालच्या उपसागरात तयार झालेले चक्रीवादळ आंध्र ते मुंबई व्हाया नगर, असा प्रवास भूभागावरून करीत अरबी समुद्रात जाणार आहे. एका समुद्रातून निघालेले वादळ भूभागावरून मार्गक्रमण करीत दुसऱ्या समुद्रात जाणे, याकडे दुर्मिळ घटना म्हणून पाहिले जात आहे. तत्पूर्वीच उत्तर भारतातून निघालेल्या परतीच्या पावसाचे गार वारे महाराष्ट्रात पोचले आहे. चक्रीवादळामुळे बाष्पयुक्त हवा तयार झाली. परतीच्या पावसाचे गार वारे त्यात मिसळले. त्यामुळे सध्या राज्यभर दमट हवामान तयार झाले. त्यात चक्रीवादळाचा प्रवास दक्षिण नगर जिल्ह्यातून होणार असल्याने, येत्या बुधवारी व गुरुवारी या भागात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्‍यता आहे. हवामानातील हे बदल अनाकलनीय असल्याचे मत जाणकार व्यक्त करीत आहेत. जलसंपदा विभागाकडे ब्रिटिश काळापासून गेल्या १०० वर्षांतील पाऊस व त्याच्या प्रवासाच्या ठळक नों...
भाजपच्या मुख्यमंत्र्यांवर टीका केल्यानं पत्रकाराला घरात घुसून मारहाण
ताज्या घडामोडी, मोठी बातमी, राष्ट्रीय

भाजपच्या मुख्यमंत्र्यांवर टीका केल्यानं पत्रकाराला घरात घुसून मारहाण

आगरताळा : त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देव यांच्या विरोधात फेसबुकवर पोस्ट केल्यानं एका पत्रकारावर हल्ला झाला आहे. बिप्लव देव यांच्यावर टीका करणारा व्हिडिओ फेसबुकवर टाकल्यानं पत्रकाराला मारहाण केल्याची घटना घडली आहे. जखमी पत्रकारावर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू आहेत. त्रिपुरातल्या स्थानिक माध्यमांनी कोरोना काळातल्या असुविधांच्या बातम्या प्रसारित केल्या होत्या. त्याबद्दल मुख्यमंत्री देव यांनी एका कार्यक्रमात नाराजी व्यक्त केली होती. माध्यमांना माफ करणार नाही, असं विधान त्यांनी केलं होतं. त्यानंतर एका पत्रकारानं त्यांच्यावर टीका केली होती. त्याच पत्रकाराला मारहाण झाली आहे. https://twitter.com/ndtv/status/1305210425336709126?s=19 ...
तबलिघी जमातीला बनवल बळीचा बकरा | FIR रद्द करण्याचे न्यायालयाचे आदेश
मोठी बातमी, राष्ट्रीय

तबलिघी जमातीला बनवल बळीचा बकरा | FIR रद्द करण्याचे न्यायालयाचे आदेश

File Photo नवी दिल्ली : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिल्लीतील निझामुद्दीन मरकझ प्रकरणातील तबलिघी जमातच्या (Tablighi Jamaat) देश आणि परदेशातील तबलिघींविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द केले आहेत. शनिवारी न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. करोना काळात तबलिघी जमातीला बळीचा बकरा बनवण्यात आल्याचं निरीक्षणही न्यायालयानं यावेळी नोंदवल आहे. सोबतच चुकीचं वार्तांकन करणाऱ्या मीडियाला फटकारताना, या लोकांना फैलावलेल्या संक्रमणासाठी आरोपी ठरवण्याचा प्रोपोगंडा चालवण्यात आल्याचंही न्यायालयानं म्हटलंय. यावेळी, दिल्लीच्या मरकझमध्ये आलेल्या परदेशी लोकांविरुद्ध प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये मोठा प्रोपोगंडा चालवण्यात आला. भारतात फैलावणाऱ्या कोविड १९ संक्रमणाचा जबाबदार हे परदेशी लोक आहेत, अशी वातावरण निर्मिती करण्यात आली. तबलिघी जमातीला बळीचा बकरा बनवण्यात आलं असं न्याया...