स्वानंद ज्येष्ठ नागरिक संघाची यशस्वी घोडदौड

स्वानंद ज्येष्ठ नागरिक संघाची यशस्वी घोडदौड

निगडी, प्राधिकरण (प्रतिनिधी) : जून महिन्यात सामूहिक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केलेल्या “स्वानंद संघाचे ” बक्षीस वाटप नुकताच कार्यक्रमात संयोजकांकडून जाहीर करण्यात आले.

प्रथम क्रमांक- पाऊस नक्षत्रे, द्वितीय क्रमांक -पाऊस पाऊस व तृतीय क्रमांक – पाऊस गाणी
या कार्यक्रमास मिळाला. हा कार्यक्रम ” पाऊस ” या संकल्पनेवर आधारित होता. “पाऊस नक्षत्रे ” कार्यक्रमाचे लेखन पुष्पा नगरकर यांनी केले होते. सर्व रोख बक्षिसे पाकिटातून देण्यात आली. त्यावेळी स्वानंद ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.

पहिले बक्षीस अविनाश पाठक यांचे हस्ते, दुसरे -डॉ.शुभांगी म्हेत्रे यांच्या हस्ते, तिसरे-विदुला आरेकर यांच्या हस्ते देण्यात आले. ज्योती कानेटकर, उषा भिसे, सुनिता यन्नुवार, मालती केसकर, उमा इनामदार,रजनी गांधी, स्मिता देशपांडे,माधुरी ओक, शरद यन्नुवार, अशोक अडावदकर, आनंदराव मुळूक, चंद्रशेखर जोशी या स्वानंद संघाच्या सभासदांनी कार्यक्रमात सादरीकरण केले होते. सूत्रसंचालन अर्चना वर्टीकर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. शुभांगी म्हेत्रे यांनी केले.

स्वानंद ज्येष्ठ नागरिक संघाची यशस्वी घोडदौड