महाराष्ट्र

Lok Marathi News – Maharashtra News in Marathi – Lok Marathi News Maharashtra – Maharashtra Marathi News by Lok Marathi News ( LokMarathi.in )

रिपब्लिकन पक्षाच्या  महाराष्ट्रातील कामगीरीकडे देशाचे लक्ष – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
महाराष्ट्र

रिपब्लिकन पक्षाच्या  महाराष्ट्रातील कामगीरीकडे देशाचे लक्ष – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई दि.२३. (लोकमराठी) - देशभरात रिपब्लिकन पक्षाचे संघटन वाढत आहे. ईशान्य भारतात रिपब्लिकन पक्षाला राजकीय यश लाभत आहे. नुकत्यात झालेल्या नागालँड विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे दोन आमदार निवडुन आले. देशभरात रिपब्लिकन पक्षाच्या नावाची चर्चा झाली. त्यामुळे  येणा-या मुंबई महानगरपालिका आणि राज्यातील विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष किती जागांवर विजय मिळवतो . आगामी काळेात महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्ष काय राजकिय कामगिरी करणार याकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे. त्यामुळे  रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकांत आपले उमेदवार निवडुन आणण्याची कामगिरी करून दाखवावी, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले.  गोराई येथील हॉटेल बेव्हयु सभागृहात आमचे रामदास आठवले या गीताच्या  ध्वनीचित्रफितीचे ना.रामदास आठवले ...
महाराष्ट्र

आक्रोश तरुणांचा, एल्गार युवक काँग्रेसचा | उद्या मुंबई येथे युवक काँग्रेसतर्फे विधानसभेला घेराव 

पिंपरी, दि. २० मार्च २०२३ : केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांवरती जनता नाराज असून सरकारच्या या धोरणांमुळे जनता मेटाकुटीला आली आहे. त्यामुळे या चुकीच्या धोरणांविरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे. त्याअनुषंगाने उद्या मंगळवारी (दि. २१ मार्च २०२३) मुंबईत विधानसभा घेराव आंदोलन केले जाणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव चंद्रशेखर जाधव यांनी दिली आहे.  याबाबत जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, कोणतीही राजकीय, सामाजिक आणि आर्थिक अस्थिरता ही सरकारच्या धोरणाचे अपत्य असते. गेल्या नऊ वर्षातील मोदी सरकारचे धोरण पाहता अच्छे दिन नको जुने दिन परत आणा अशी बहुसंख्य भारतीयांची भावना झाली आहे. नोटबंदीचे अघोरी कृत्य, सेवा आणि वस्तू कर यांची चुकीची अंमलबजावणी आणि रशिया-युक्रेन युद्ध यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर भीषण परिणाम झाला आहे. तरुणाई ...
महाराष्ट्र, राजकारण

प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव चंद्रशेखर जाधव यांच्याकडे धुळे जिल्ह्याची जबाबदारी

पुणे, दि. ७ मार्च २०२३ : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने (MPYC) काँग्रेस संघटन बळकट करण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांच्या प्रभारींची नव्याने नियुक्ती केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव चंद्रशेखर जाधव यांच्याकडे धुळे जिल्ह्याची (ग्रामीण) जबाबदारी सोपविण्यात आली आहे. चंद्रशेखर जाधव (Chandrashekhar Jadhav) यांनी केंद्र व राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणांवर नेहमीच टिका केली असून विविध प्रकारची आंदोलने केली आहेत. त्यांच्यावर आता धुळे जिल्हा ग्रामीणची प्रभारी म्हणून जबाबदारी दिली आहे. पक्षाच्या वरिष्ठांनी त्यांच्यावर टाकलेली ही जबाबदारी ते समर्थपणे सांभाळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला असून या निवडीबद्दल त्यांनी प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत, प्रदेश प्रभारी मितेंद्र दर्शनसिंग, सह प्रभारी प्रदीप सिंधव, सोशल मीडिया प्रदेश प्रभारी झीनत सबरीन व ...
महाराष्ट्र, मोठी बातमी

मयत पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबियांना शासनाकडून 25 लाखांची मदत देण्याची घोषणा – पालकमंत्री उदय सामंत

मयत वारिसे यांच्या मुलाला कायम स्वरूपाची नोकरी देण्याची जबाबदारीही स्वीकारली रत्नागिरी, दि.12 (जिमाका) : पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबातील त्यांचा एक मुलगा आणि आजी यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. या कुटुंबियांना शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी पत्रकार संघटनांकडून संपूर्ण महाराष्ट्रातून करण्यात येत होती.  आज रत्नागिरीत रोजगार महामेळाव्याच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत येथील पत्रकारांनीही पत्रकार वारिसे यांच्या कुटुंबियांना शासनाकडून मदत मिळावी, ही मागणी उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे पुन्हा मांडली. पत्रकारांच्या या मागणीची दखल घेत मंत्री उदय सामंत यांनी तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा केली.  या चर्चेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 10 लाख व इतर माध्यमातून 15 लाख अशी मदत मयत पत्रकार वारिसे यां...
महाराष्ट्र

१८फेब्रुवारी रोजी “मराठ्यांची गौरवगाथा” महानाट्याचे आयोजन; छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास एकाच रंगमंचावर

रायगड, दि.४ (लोकमराठी) - १८ फेब्रुवारीला "मराठ्यांची गौरवगाथा" महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.(निर्मित/ लिखित/ दिग्दर्शित )प्रवीण नंदकुमार देशमुख यांनी शिवदुर्ग मित्र प्रस्तुत "मराठ्यांची गौरवगाथा" या महानाट्याची अधिकृत घोषणा केली. २फेब्रुवारी १६६१ रोजी कर्तलबखानाच्या बलाढ्य सैन्याचा छत्रपती शिवाजी महाराज व सरनोबत नेताजी पालकर यांच्या सैन्याने गनिमी कावा या युद्धनीतीने संपूर्ण पराभव केला त्यांना शरणागती पत्करायला लावली व शिवाजी महाराजांचा मोठा विजय झाला म्हणूनच २फेब्रुवारी हा दिवस विजय दिन म्हणून साजरा केला जातो, यावर्षी ३६२ वा विजय दिन सोहळा उंबरखिंडीमध्ये साजरा करण्यात आला. याचे आयोजन पंचायत समिती खालापूर, जिल्हा परिषद, तसेच शिवदुर्ग मित्र लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले याच दिवसाचे औचित्य साधून शिवदुर्ग मित्र प्रस्तुत प्रवीण नंदकुमार देशमुख (नि...
महाराष्ट्र

श्री नगद नारायण, गोसावी बाबा शेतकरी ग्रामविकास पॅनलचा एकतर्फी विजय

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क हाजीपुर, बीड (दि. 20 डिसेंबर) : नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल आज सर्वत्र जाहीर झाले. विजय उमेदवारांचे गुलाल, ढोल-ताशे आणि डीजेच्या आवाजामध्ये सर्वत्र आनंद उत्सव आणि जल्लोषात स्वागत होत आहे. याचप्रमाणे बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील हाजीपुर गावची ग्रामपंचायत निवडणूक ही मोठ्या उत्साहात पार पडली. देशाच्या स्वातंत्र्यापासून ते आज पर्यंत गावची ग्रामपंचायत ही बिनविरोध म्हणून गणली जात होती. परंतु या पंचवार्षिक निवडणुकीला पहिल्यांदाच दोन पॅनल गावामध्ये पडले आणि प्रथमच निवडणूक गावामध्ये झाली. श्री नगद नारायण गोसावी बाबा शेतकरी ग्रामविकास पॅनल आणि श्री गोसावी बाबा ग्रामविकास पॅनल या दोन पॅनल मध्ये काट्याची टक्कर झाली. आणि यामध्ये श्री नगद नारायण गोसावी बाबा शेतकरी ग्रामविकास पॅनल चे सर्वच्या सर्व उमेदवार हे मोठ्या फरका...
महाराष्ट्र, मोठी बातमी

दोन जुळ्या बहिणींनी एकाच मुलाशी केला विवाह ; हे आहे कारण… 

लोकमराठी न्यूज नेटवर्क : सोलापूर जिल्ह्यातील अकलूज (ता. माळशिरस) येथे दोन जुळ्या बहिणींनी एकाच मुलाशी विवाह केलाय. सोशल मीडियावर या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. एकाच मुलासोबत, एकाच वेळी सख्ख्या बहिणींच्या या आगळ्या वेगळ्या लग्नाची आता सोशल मीडियावर चर्चा होतीये. शुक्रवारी अकलूज-वेळापूर रोडवरील गलांडे हॉटेल येथे हा अनोखा विवाह संपन्न झालाय.   अतुल हा सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील असून त्याचा मुंबई येथे ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. तर कांदिवली मधील उच्चशिक्षित पिंकी आणि रिंकी या जुळ्या बहिणी आहेत. सहा महिन्यांपूर्वी पिंकी, रिंकी आणि त्यांची आई आजारी पडल्यानंतर अतुल नावाच्या टॅक्सी ट्रॅव्हल करणाऱ्या युवकाने रुग्णालयात त्यांची काळजी घेतली होती. यातून त्यांचे प्रेम जुळले आणि नातेवाईकांच्या संमतीने काल हा विवाह अकलूज मध्ये पार पडला.  इंजिनीअर पदावर कार्यरत अ...
महाराष्ट्र, मोठी बातमी

अहमदनगर : अकोले तालुक्यातील अवैध दारू विक्री बंद करा 

अहमदनगर : Ahmednagar जिल्ह्यातील राजूर, शाहूनगर आणि अकोले (Akole) तालुक्यातील अवैध दारू विक्री बंद करावी व शाहूनगर व राजूरला पोलीस अधीक्षकांनी भेट द्यावी. यासाठी आज अहमदनगर येथे पोलीस अधिक्षक राकेश ओला (Rakesh Ahla) यांना सामाजिक कार्यकर्ते व लेखक हेरंब कुलकर्णी (Herambh Kulkarni) यांनीनिवेदन दिले. सोबत सावली संस्थेचे नितेश बनसोडे होते. यावेळी कुलकर्णी यांनी तालुक्यात होणारी अवैध विक्री, रात्रीची चोरटी वाहतुक याविषयी त्यांना माहिती दिली. राजूर येथील दारू विक्रेत्यांना मदत करणाऱ्या पोलिसांच्या बदल्या करा, बिट अंमलदार यांना तालुक्यात जबाबदार धरा. अशी मागणी यावेळी कुलकर्णी यांनी केली, सोबत सावली संस्थेचे नितेश बनसोडे होते. ...
महाराष्ट्र, मोठी बातमी

अरे आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार आहात? – जयंत पाटील

मुंबई, दि. २८ ऑक्टोबर : गुजरात (Gujarat) निवडणुकांच्या अनुषंगाने सर्व प्रकल्प गुजरातला नेले जात आहेत आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मात्र बघ्याच्या भूमिकेत आहे. आमचा महाराष्ट्र (Maharashtra) कुठे नेऊन ठेवणार आहात ? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress party) प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शिंदे सरकारला केला आहे.  वेदांता फोक्सकॉन प्रकल्पापाठोपाठ आता नागपुरात (Nagpur) येणारा एअरबस प्रकल्पदेखील महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया ट्वीटच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पानंतर नागपूरमध्ये होणारा २२ हजार कोटींचा टाटा एअरबस प्रकल्प आज गुजरातला गेला. एकामागून एक मोठे प्रकल्प गुजरातला जात आहेत. महाराष्ट्रातील सध्याचे सरकार दिल्ली...
महाराष्ट्र

वीज चोरी करणाऱ्यांविरोधात भर जहागिर येथे मोठी कारवाई

रिसोड: आकडे टाकून वीज चोरी करणाऱ्या नागरिकांवर महावितरणानं कारवाईचा बडगा उगारला आहे. रिसोड तालुक्यातील भरजहागिर येथे महावितरण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रविण कुमार जंगले यांच्या मार्गदर्शनाखाली रिसोड ग्रामणीचे सहाय्यक अभियंता हरिष गिर्हे यांनी (दि.11) रोजी भरजहागिर येथे विज मिटर तपासणी आणि विज चोरी उघडकीस आणि आहे. वीज अधिनियम २००३ कलम १३५ अन्वये सतरा जणांवर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये गजानन नारायण मुरकुटे, श्रीराम पुंजाजी फुके, शंकर रुजाजी फुके, जगन्नाथ नारायण चोपडे, प्रल्हाद विठ्ठल चोपडे, बाळकृष्ण रामाजी चोपडे, बळीराम सिताराम चोपडे, अर्जुना तुळशीराम काळदाते, आत्माराम नारायण तायडे, रंगनाथ शिवराम सानप, भगवान बाजीराव सानप, नारायण हरिभाऊ सानप, राजू मोहन डहाके, सुधाकर विश्वनाथ जिरवणकर, भगवान शभुआप्पा पतवार, मोरया दुध डेअर (महाजन) गज...
Join WhatsApp Group
Exit mobile version