सिनीयर बुकिंग क्लर्क (सीसीटीसी) यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करून जबरी चोरी तीन आरोपींना अटक; बंडगार्डन पोलीस तपास पथकाची कामगिरी
पुणे, दि २४ (लोक मराठी) - पुणे रेल्वे स्थानकात कर्तव्य बजावत असलेल्या सिनीयर बुकिंग क्लर्क (सीसीटीसी) यांस चाकुने जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करुन जबरी चोरी करणाऱ्या तीन आरोपींना डोबिवली (पुर्व), ठाणे येथुन बंडगार्डन पोलिसांच्या तपास पथकाने अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नागे कॅलविन सोलोमन मायला (वय वर्षे २९, धंदा रेल्वेत नोकरी, रा. सर्वे नं. ८९ घर नंबर ०४ लेन नं.०६ धायरकर कॉलनी, मुंढवा, पुणे) हे दिनांक १८ मंगळवार २०२६ रोजी रात्री ०१/०० वाजता तिकीट विक्रीचे रेल्वे प्रशानाचे कर्तव्य बजावत असताना त्यांना ०२ अनोळखी चाकुने वार करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करुन त्यांचे कडील रोख रक्कम, ०२ मोबाईल फोन, सोन्याची चैन जबरदस्तीने काढुन घेवुन गुन्हा करुन पळुन गेले होते. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरुन बंडगार्डन पो.स्टे. गु.र.नं. २१२/२०२६ भा.न्या.सं. कलम ३०९(...










