उकडीचे मोदक – गणेश चतुर्थी स्पेशल

उकडीचे मोदक - गणेश चतुर्थी स्पेशल
गणेश चतुर्थीसाठी बाजारात अनेक प्रकारचे मोदक उपलब्ध असले तरी खरा मान असतो तो उकडीच्या मोदकालाच. कोकणाची खासियत असलेले उकडीचे मोदक आता महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात आणि जगभरातही लोकप्रिय होत आहेत. खरे तर यात तीनच मुख्य घटक लागतात – तांदळाची पिठी, नारळ आणि गूळ. आणि तूप वापरले नाही तर वेगन डाएट करणाऱ्यांनाही सहज खाता येतील. तर आज करून पाहूया authentic उकडीचे मोदक. खाली विशेष टिप्स दिल्या आहेत ज्यामुळे मोदक बनवणे सोपे जाईल.साहित्य :सारणासाठी१ मोठा नारळ, खवणून शक्यतो पांढराशुभ्र भाग घ्यावा. १ मोठी वाटी गूळ, किसून अर्धा चमचा वेलचीपूड
कव्हरसाठी१ ग्लास मोदकाचे पीठ (हे बाजारात सहज मिळते पण घरीही बनवू शकतो, कृती खाली वेगळी दिली आहे.) २ चमचे साजूक तूप १ ग्लास पाणीकुकिंग टिप्स :कोकणात बरेचदा गोड पदार्थात मीठ घातले जाते. हवे असल्यास उकडीसाठी पाणी उकळताना त्यात कणभर घालावे. आणि सारणातही चिमूटभर घालावे. किंचित मिठाने गोड पदार्थांचा स्वाद वाढतो. सारणामध्ये आवडीनुसार, ड्रायफ्रूट्सचे छोटे तुकडे, चारोळी, खसखस, जायफळपूड असेही वापरू शकता. खसखस थोडी परतून मग घालावी. उकडीमध्ये दुधात खललेले केशर घातल्यास स्वाद दुणावतो आणि दिसतेही सुंदर. वेगन व्यक्तींनी उकडीत तुपाऐवजी तेल वापरावे. आवडत असल्यास केळीऐवजी हळदीच्या पानात वाफवावे.मोदक पीठ घरी करण्याची पद्धत : जुना आंबेमोहोर किंवा कुठलाही सुगंधी तांदूळ स्वच्छ धुऊन सुती कापडावर सावलीत सुकवावा. तांदूळ पूर्ण कोरडे झाल्यावर अगदी बारीक दळून आणावेत. बारीक चाळणीने चाळून घ्यावे. हेच मोदकाचे पीठ. प्रथम सारण बनवून घ्यावे. खवणलेला नारळ आणि किसलेला गूळ असे हाताने एकत्र कालवून घ्यावे. नंतर मध्यम आचेवर शिजवून घ्यावे. सारण फार कोरडे करू नये. उतरवून वेलचीपूड मिसळावी.
कव्हर म्हणजेच उकड बनवण्यासाठी एक ग्लास पाणी (मापून घ्यावे) उकळत ठेवावे. त्यात २ चमचे तूप घालावे. उकळी फुटल्यावर त्याच मापाने १ ग्लास मोदक पीठ त्यात घालावे. वेगाने ढवळून एकत्र करावे. आच बंद करून, झाकण ठेवून सात आठ मिनिटे तसेच ठेवावे.
नंतर थंड पाण्याच्या हाताने उकड चांगली मळून हलकी करून घ्यावी. या उकडीचे लिंबाच्या आकाराचे गोळे करून घ्यावेत आणि तेही चांगले मळून घ्यावेत. एकेक गोळा घेऊन बोटांनी खोलगट पातळ वाटी बनवावी. वाटीला सर्व बाजूंनी चिमटून कळ्यांचा आकार द्यावा. यात दोन ते तीन चमचे सारण दाबून बसवावे. मग सगळ्या कळ्या एकत्र वर घेऊन टोक काढावे. टोकावर उकड जास्त वाटत असल्यास काढून टाकावी.
एका टोपात अंदाजे एक लिटर पाणी उकळत ठेवावे. वर चाळणी ठेवावी. त्यात केळीचे पान कापून बसवावे. सगळे मोदक तयार झाल्यावर चाळणीत केळीच्या पानावर ठेवून, वर झाकण ठेवून दहा मिनिटे मोठ्या आचेवर वाफवावेत.
वाढताना मोदकावर साजूक तूप घालून द्यावे.कुकिंग टिप्स :
  • कोकणात बरेचदा गोड पदार्थात मीठ घातले जाते. हवे असल्यास उकडीसाठी पाणी उकळताना त्यात कणभर घालावे. आणि सारणातही चिमूटभर घालावे. किंचित मिठाने गोड पदार्थांचा स्वाद वाढतो.
  • सारणामध्ये आवडीनुसार, ड्रायफ्रूट्सचे छोटे तुकडे, चारोळी, खसखस, जायफळपूड असेही वापरू शकता. खसखस थोडी परतून मग घालावी.
  • उकडीमध्ये दुधात खललेले केशर घातल्यास स्वाद दुणावतो आणि दिसतेही सुंदर.
  • वेगन व्यक्तींनी उकडीत तुपाऐवजी तेल वापरावे.
  • आवडत असल्यास केळीऐवजी हळदीच्या पानात वाफवावे.
  • मोदक पीठ घरी करण्याची पद्धत :
जुना आंबेमोहोर किंवा कुठलाही सुगंधी तांदूळ स्वच्छ धुऊन सुती कापडावर सावलीत सुकवावा. तांदूळ पूर्ण कोरडे झाल्यावर अगदी बारीक दळून आणावेत. बारीक चाळणीने चाळून घ्यावे. हेच मोदकाचे पीठ.