रावेतमध्ये पतीने केला पत्नीचा खून ; सुसाइड नोट लिहून केली आत्महत्या

रावेतमध्ये पतीने केला पत्नीचा खून ; सुसाइड नोट लिहून केली आत्महत्या

पिंपरी (लोक मराठी ) : पिंपरी चिंचवड येथील रावेत याठिकाणी पत्नीचा हातोडीने खून करून पतीने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (ता.२८) सकाळी सव्वा आठच्या सुमारास उघडकीस आली आहे .कौटुंबिक जीवनातील ताणतणावाला वैतागून आत्महत्या केल्याचे समजते आहे.

घटनास्थळी पोलीसांना सुसाइड नोट सापडली आहे. वृक्षाली गणेश लाटे (वय ४०, रा. आदित्य टेरेस, शिंदे वस्ती, रावेत), असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर पती गणेश ऊर्फ संजू चंद्रकांत लाटे (४५) यांनीही आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे चारच्या सुमारास गणेश यांनी आपल्या पत्नीचा हातोडी डोक्यात मारून खून केला.

त्यानंतर स्वतः गळफास घेत आत्महत्या आत्महत्या केली. गेल्या काही दिवसांपासून पत्नी वृषाली या आजारी होत्या. आजारपणात त्यांना होणाऱ्या यातना सहन न झाल्याने त्यांचा खून करून आपण आत्महत्या करीत असल्याचे गणेश यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. याबाबत अधिक तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.