नितीन ब्रह्मे
‘नोव्हया गझेता’ (Новая газета) या स्वतंत्र माध्यम म्हणून रशियात पाय घट्ट रोऊन उभ्या असलेल्या स्वतंत्र माध्यमाचा संपादक-पत्रकार द्मित्री मुरातोफ याला यावर्षीचा नोबेल पुरस्कार ‘रॅपलर’च्या मारीया रेस्सा यांच्याबरोबर विभागून मिळाला आहे. त्यामुळे स्वतंत्र पत्रकारीतेला सन्मान मिळाला असून, एक उत्साहवर्धक चित्र निर्माण झाले आहे.
नोव्हया म्हणजे नवे, नावीन्यपूर्ण आणि गझेता म्हणजे वृत्तपत्र.
दीमीत्री यांनी १९९३ साली ५० सहकाऱ्यांसह ‘नोव्हया गझेता’ची स्थापना केली. त्याआधी ते सगळे जण ‘कमसोमोलसक्या प्रावदा’ या वृत्तपत्रात काम करत होते.
दोन रूममध्ये दोन कॉम्प्युटर, एक प्रिंटर आणि अजिबात पैसे नाहीत, या स्थितीत त्यांनी नवे माध्यम उभे केले. मिखाईल गोरबाचेफ यांना मिळालेल्या नोबेल पुरस्काराच्या रकमेतील काही भाग त्यांनी दिल्याने कॉम्प्युटर आणता आले आणि थोडा पगार देता आला.
पुतीन आणि त्यांच्या राजवटीच्या विरोधात दीमीत्री आणि ‘नोव्हया गझेता’ ठामपणे उभे आहेत. शोधपत्रकारिता करत आहेत. दीमीत्री गेली २३ वर्षे ‘नोव्हया गझेता’चे मुख्य संपादक आहेत. त्यांनी चेचेन युद्ध, उत्तर कॉकेशस याठिकाणच्या परिस्थितीसंदर्भात शोध पत्रकारिता केली आहे.
अॅना पोलीतकोफस्कया यांच्यासह ‘नोव्हया गझेता’च्या ७ पत्रकारांना पत्रकारीता करताना आपला जीव गमवावा लागला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता आणि परकीय भाषा विभागाच्या संयुक्त शोध प्रकल्पात एका संशोधन प्रकल्पात काम करायची संधी उज्ज्वला बर्वे Ujjwala Barve आणि अनघा भट यांनी दिली होती, तेंव्हा ‘नोव्हया गझेता’ विषयी अभ्यास करण्याचा योग आला होता.
(छायाचित्र – नोबेल मिळाल्यानंतर ‘नोव्हया गझेता’ची टीम)