सामाजिक कार्यकर्ते आण्णासाहेब मुळे यांचे निधन

सामाजिक कार्यकर्ते आण्णासाहेब मुळे यांचे निधन

अहमदनगर : मुळेवाडी (ता. कर्जत) येथील सामाजिक कार्यकर्ते आण्णासाहेब किसन मुळे (वय ६२) यांचे गुरूवारी (ता. ३१ डिसेंबर) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे असे अचानक जाण्याने मुळेवाडीवर शोककळा पसरली आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी व सुना-नातवंडे असा परिवार आहे. प्रगतशील शेतकरी व व्यावसायिक दादासाहेब मुळे व पिंपरी चिंचवड येथील प्रगती शिक्षण संस्था संचलित सौ राणूबाई नागूभाऊ बारणे प्रशाला थेरगावचे मुख्याध्यापक सचिन मुळे यांचे ते वडील होत.

मुळे यांचा स्वभाव मनमिळाऊ व उदार असल्याने अनेकांना त्यांच्या निधनाचा धक्का बसला आहे. दरम्यान, नऊ जानेवारी रोजी सिध्देटेक येथे दशक्रिया विधी होणार आहे.