काळेवाडीतील नंददीप कॉलनी रस्त्याची दुरावस्था

काळेवाडीतील नंददीप कॉलनी रस्त्याची दुरावस्था

काळेवाडी : नढेनगर मधील नंददीप कॉलनी क्रमांक ४, हभप कै सिताराम बाळोबा नढे रस्त्यावर खड्डे पडले असून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत असल्याने रस्त्याची तातडीने दुरूस्ती करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख इरफान अब्दुल रहीम यांनी केली आहे.

काळेवाडीतील या रस्त्यावर मोठी रहदारी असते. अबालवृद्ध या रस्त्याने ये-जा करत असतात. रस्ता खराब झाला असल्याने पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. स्थानिक नागरिक हैराण झाले असून सतत डांबरीकरण करूनही रस्ता व्यवस्थित होत नाही. त्यामुळे महापालिकेने या रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे गरजेचे आहे. असे सामाजिक कार्यकर्ते शेख यांनी सांगितले.