क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशनच्या विद्यमानाने बुद्ध रूप मूर्ती स्थापना कार्यक्रम संपन्न

क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशनच्या विद्यमानाने बुद्ध रूप मूर्ती स्थापना कार्यक्रम संपन्न 

रहाटणी : येथील शाळे मध्ये “बुध्दरुपाची प्रतिष्ठापना” (स्थापना) भंते धम्मानंदजी (पारणेर) व भंते पट्टीसेनजी यांच्या हस्ते केली. यावेळी रहाटणी गावातील ज्येष्ठ मान्यवर आयु रघुनाथ भालेराव, विठाबाई चाबुकस्वार, सारनाथ बुध्द विहार अध्यक्ष शांताराम भालेराव, कुरुळी गावचे ग्रामपंचायत सदस्य प्रतिभा कांबळे, बौध्दाचार्य गोरख रोकडे, तात्या शिनगारे, चैतन्य हस्य क्लबचे प्रमोद देशमुख व इतर सदस्य, भारतीय बौध्दजन विकास समिती सदस्य प्रदिप पवार, मिलिंद जाधव, प्रमोद गायकवाड, राजेश भालेराव, इंजि. विजय कांबळे (अध्यक्ष बानाई ) व प्राध्यापक वसंत चाबुकस्वार, संदीप चाबुकस्वार यांचे संपूर्ण कुटुंब व मित्र परिवारव इतर सदस्य उपस्थित होते.

क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशनच्या विद्यमानाने बुद्ध रूप मूर्ती स्थापना कार्यक्रम संपन्न 

या ऐतिहासीक कार्यक्रमात नेत्रदीपक, विराट, शांततेचे प्रतीक असलेल्या तीन फूट तीन इंच सम्यक गौतम बुद्धरूप मूर्तीचे अनेक अनुयाईंच्या उपस्थितीत महाबुद्ध वंदना म्हणून भंतेंच्या हस्ते अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बौध्दाचार्य माजी श्रामनेर मेजर सुरेश भालेराव (समता सैनिक दल पिं – चिं विभाग) यांनी केले. कार्यक्रम अतिशय धम्ममय वातावरणात संपन्न झाला.