Pune : पुणे सराफ असोसिएशनकडून 21 लाख रुपयांची मुख्यमंत्री सहायता निधीस मदत

Pune : पुणे सराफ असोसिएशनकडून 21 लाख रुपयांची मुख्यमंत्री सहायता निधीस मदत

पुणे (लोकमराठी) : कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पुणे सराफ असोसिएशनच्या वतीने 21 लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. या मदतीचा धनादेश विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

यावेळी पुणे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, सेक्रेटरी अमृत सोलंकी, खजिनदार कुमारपाल सोलंकी, माणिकलाल बलडोट, उगम गुंदेचा, गौतम सोलंकी, कांतीलाल ओसवाल, फुलचंद ओसवाल, नेमीचंद कोरमता उपस्थित होते.

कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न सुरू आहेत. त्यात आर्थिक बाजू कोलमडू नये यासाठी अनेक लोक, संस्था मदतीचा हात पुढे करत आहेत.

Pune : पुणे सराफ असोसिएशनकडून 21 लाख रुपयांची मुख्यमंत्री सहायता निधीस मदत