धर्मराज आवटे यांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर

धर्मराज आवटे यांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर

लोकमराठी न्यूज नेटवर्क

पिंपरी : महाराष्ट्र पोलिस विभागात विविध प्रकारच्या कर्तव्यामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील पोलिस हवालदार धर्मराज जनार्दन आवटे (गुन्हे शाखा) यांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक जाहीर झाले आहे. याबाबतचा आदेश गुरूवारी महासंचालक सु. कु. जायसवाल यांनी काढला.

दरम्यान, राज्यभरातील आठशे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना हे सन्मानचिन्ह जाहीर झाले असून त्यामध्ये पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील पोलिस निरिक्षक शैलेश गायकवाड, सहाय्यक पोलिस निरिक्षक रविंद्र राठोड, पोलिस हवालदार अहमद शेख, राजेंद्र शेटे, पोलिस नाईक दत्तात्रय बनसोडे, महिला पोलिस नाईक दिपमाला लोहकरे, महिला हवालदार प्रभावती दिलीप गायकवाड यांचा समावेश आहे.