
चिंचवड, (लोकमराठी) : शिवतेजनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी श्री दत्त जयंती उत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम झाले.
सकाळी 7 ते 9 अभिषेक व होम पूजा तसेच 10 ते 12 श्री स्वामी समर्थ महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम, दुपारी 2 ते 4 श्री सिद्धेवर भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम व सायंकाळी 4 ते 6 श्री साई अबोली महिला भजनी यांचे भजन झाले. सायंकाळी 6 ते 6.40 प्रवचन व 6.45 ते 7 श्री दत्त जन्मोत्सव साजरा केला. त्यानंतर रात्री 7 वाजता आरती व 7.30 ते 10 या वेळेत सुरश्री प्रस्तुत ओंकार संगीत संध्या यांचा भजनाचा कार्यक्रम तसेच महाप्रसाद देण्यात आला.
महाप्रसादासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुमारे 8 ते 9 हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी श्री स्वामी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. नगरसेवक नारायण बहिरवाडे, प्रा. हरिनारायण शेळके, राजू गुणवंत, संतोष शेळके, दत्तू बहिरवाडे, मंगेश पाटील, अर्चना तोंडकर, अंजली देव, सारिका रिकामे, अक्षदा देशपांडे, नीलिमा भंगाळे, प्रीती झोपे, शोभा नलगे, कैलास मुळे, श्रावण अवसेकर, भारत शेंडगे, नागनाथ दोडके, श्रीकांत लोमटे, निवृत्ती धाबेकर गुरुजी, यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले. सूत्रसंचालन निवेदक राजाराम सावंत यांनी केले.