काळेवाडी, ता. 6 : रॉयल फाउंडेशन व काँग्रेसचे युवा नेते रवि नांगरे यांच्या वतीने गौरी गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली. त्यानिमित्त गेली तीन दिवस रॉयल फाउंडेशनच्या टिमने विजयनगर, ज्योतिबानगर, तापकीरनगर, राजवाडेनगर, कोकणेनगर, आदर्शनगर व पवनानगर आदी परिसरात घरोघरी जाऊन गौरी गणपती सजावटीची पहाणी केली. लवकरच या स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक निवडले जाणार असून सहभागी सर्व स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. असे नांगरे यांनी सांगितले.
या स्पर्धेला माता भगिणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष रवि नांगरे, उपाध्यक्ष आनंद काटे, सचिव प्रकाश नांगरे, खजिनदार गणेश नांगरे, कार्याध्यक्ष अजय काटे, सल्लागार सुवर्ण सोनवलकर, राजश्री पांचाळ, संकल्प बचत गटाच्या अध्यक्षा आशा नांगरे, समृध्दी गटाच्या अध्यक्षा राधा काटे, तुलसी नांगरे त्याचबरोबर अनेक बचत गटाच्या अध्यक्षा उपस्थित होत्या.
याप्रसंगी बहिणींशी संवाद साधताना अनेक बहिणींच्या भावना अनावर झाल्या. भावना व्यक्त करताना, काही बहिणी म्हणाल्या की, ” प्रथमच भावाच्या रूपाने रवि नांगरे हे गौरी गणपतीनिमित्ताने आमच्या घरी आले, व मनमोकळा संवाद साधला.”
माता भगिणींनी सांगिलेल्या समस्या आगामी काळात रॉयल फाउंडेशनच्या माध्यमातून सोडविण्याचे आश्वासन नांगरे यांनी त्यांना दिले. तसेच यावेळी रवि नांगरे याच्या मातोश्री आशा नांगरे यांच्या हस्ते सर्व गौरींची ओटी भरून आशिर्वाद घेण्यात आला. या स्पर्धेमध्ये माता भगिणींचा प्रसिसाद बघुन खुप आनंद झाला. असे नांगरे यांनी सांगितले.
आम्ही गोरी गणपती सजावटीची पहाणी करत असताना जिवंत देखावे, इको-फ्रेंड्ली, भारतीय संस्कृती दर्शवणारे देखावे, ग्रामीण जीवन दर्शविणारे देखावे, देशभक्तीपर, शिवस्मारक देखावे, तेसच मनाला भावणारे व डोळ्यांना सुखवणारे आवर्षक देखावे तयार करण्यात आले होते.
गेली तीन-चार वर्षे कोविडचे सावट असल्याने गौरी गणपती सण मन-मोकळ्यापणाने साजरा करण्यात आला नाही. मात्र, यंदा कोविडचे निर्बंध कमी केल्यामुळे गणेश भक्तांना गणेशोत्सव मनमोकळे पणाने साजरा करता आला. याचे समाधान वाटते. असे मत रवि नांगरे यांनी लोकमराठी न्यूजशी बोलताना व्यक्त केले.