ओणम म्हणजेच एकात्मतेचे प्रतीक; माजी राज्यपाल कुम्मनम राजशेखरन यांचे प्रतिपादन

ओणम म्हणजेच एकात्मतेचे प्रतीक; माजी राज्यपाल कुम्मनम राजशेखरन यांचे प्रतिपादन 

लोक मराठी : एकात्मता व ऐक्याचे प्रतीक म्हणजेच ओणम सण होय. सर्व जाती धर्मातील नागरीकांना एकत्र आल्यास समाजाचा विकास होईल. असे उदगार मिझोरमाचे माजी राज्यपाल कुम्मनम राजशेखरन यांनी काढले. नायर सर्व्हिस सोसायटी पिंपरी-चिंचवडच्या वतीने निगडी येथील कृष्णा मंदिरात आयोजित केलेल्या ओणम कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी आयोकी ग्रूपचे अध्यक्ष गणेश कुमार,सीरम इंस्टीट्यूटचे संचालक पी.सी नांबियार,श्रीकृष्ण मंदिराचे अध्यक्ष हरिदास नायर, टी.पी.सी नायर, नायर सर्व्हिस सोसायटीचे अध्यक्ष विश्वनाथन नायर,सचिव शशी कुमार,खजिनदार पी रवींद्रन आदी उपस्थित होते.

यावेळी भारत केसरी मन्नत पद्मनाभन यांच्या नावाने दिला जाणारा मन्नम पुरस्कार व्ही जी नायर यांना प्रदान करण्यात आला. तसेच दहावी/ बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला. सूत्रसंचालन व प्रास्ताविक विश्वनाथन नायर यांनी तर आभार पी. रवींद्रन यांनी मानले.