गणेश आचार्यवर महिलेने केले गंभीर आरोप

गणेश आचार्यवर महिलेने केले गंभीर आरोप

मुंबई (लोकमराठी ) – बॉलिवूडचे कोरियोग्राफर गणेश आचार्य हे नृत्य शिकवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या हटके अंदाजातील कोरियोग्राफीमुळे ते नेहमी चर्चेत असतात. मात्र यावेळी ते आपल्या गंभीर कोरियोग्राफीमुळे नाही तर गंभीर आरोपामुळे चर्चेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश आचार्यविरोधात एका 33 वर्षीय नृत्यदिग्दर्शिकेने अंबोली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. गणेश आचार्य कमिशनची मागणी करत अश्लिल व्हिडीओ पाहण्यासाठी बळजबरी करत असल्याचा गंभीर आरोप या महिलेने केला आहे.

गणेश आचार्य इंडियन फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन कोरिओग्राफर्स असोसिएशनचा महासचिव बनल्यापासून तिचा मानसिक छळ करत होता.

तिने विरोध केल्यावर गणेशने तिचे सदस्यत्व रद्द केले, ज्यामुळे तिचे उत्पन्न बंद झाले. २६ जानेवारीला माझे सदस्यत्व का रद्द केले? असा जाब विचारला असता गणेश आचार्य संतापला आणि त्याने त्याच्या सोबतच्या कोरिओग्राफर्सला सांगून पीडितेला बाहेर हाकलण्यास सांगितले. याचदरम्यान, पीडिता गणेशच्या ऑफिसात जायची तेव्हा तो तिला अश्लिल व्हिडीओ पाहण्यास बळजबरी करायचा.

तत्पूर्वी, ज्येष्ठ कोरिओग्राफर सरोज खान यांनीही गणेश आचार्यवर गंभीर आरोप केले होते. गणेश आपले वजन वापरून नव्या डान्सर्सला गंडवत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.