काळेवाडीत सांडपाणी तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

काळेवाडीत सांडपाणी तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

काळेवाडी : नढेनगरमधील ड्रेनेज लाईन तुंबल्याने नाल्यात सांडपाणी साचले आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेने तातडीने योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

साचलेल्या सांडपाण्यामुळे दुर्गंधी पसरली असून डासांचा त्रास वाढला आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने महापालिका प्रशासनाने तात्काळ दखल घेणे गरजेचे आहे.

दरम्यान, परिसरात साफसफाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख इरफान अब्दुल रहीम यांनी केली आहे. याबाबत शेख यांनी महापालिका प्रशासनाला निवेदन दिले आहे.

ड्रेनेज लाईनचे चेंबर फुटले असून त्यामध्ये माती जमा झाली आहे. त्यामुळे ड्रेनेज लाईन तुंबली असून नाल्यात पाणी साचले आहे. आमचे प्रयत्न सुरू असून लवकरच याठिकाणी नवीन ड्रेनेज लाईन टाकली जाणार आहे. – जितेंद्र देवकर, अभियंता, पिंपरी चिंचवड महापालिका