माणुसकी अजून जिवंत आहे

माणुसकी अजून जिवंत आहे

हल्ली सहजच चालता बोलता, कार्यालयात, नातेवाईकांमध्ये, मित्रांमध्ये, इतरत्र एक वाक्य कायम ऐकावयास मिळते, ,”हल्ली नाती आता व्यवहारी झाली आहेत “, म्हणजे कोणतेतरी हितसंबंध असल्याशिवाय एकमेकांशी नाते ठेवायचे नाही .या सर्व नात्यांना एक प्रकारे आर्थिक किंवा राजकीय स्वरूप प्राप्त झाले आहे. पण याच्या विरुद्ध अनुभव देखील येत असतात.

असाच एक अनुभव सध्याच्या पावसाने व वादळाने उध्वस्त केलेल्या कोकणातील एका भागात आला. यावर्षी पाऊस वादळ याने कोकणात थैमान घातले आहे .यात भरीस भर दरडी कोसळणे ,डोंगर खचणे ,जमीन खचणे यामुळे गाव वाड्या उध्वस्त झाल्या. जनता इतरत्र मिळेल त्या ठिकाणी आश्रय शोधू लागले जनावरे जीवित हानी देखील झाले यांना मदतीचा हात देण्यासाठी पुण्यातील एका समूहाने कंबर कसली कोकणातील दुर्गम भागातील बिरवाडी,कुंभार वाडा,खरवली,किंजळघर,दादली,चोचिंदे या वाड्या-वस्त्या पर्यंतच्या १२२ कुटुंबांना १५ दिवस पुरेल एवढे अन्न धान्य व इतर जीवनावश्यक वस्तू पुण्यातील एका मंदिरात जमा करून ,त्यांची पॅकेट्स, पोती, प्लास्टिकच्या बाटलीत बंद करून कोकणातील घरोघरी पुरविण्यात आल्या.

माणुसकी अजून जिवंत आहे

पुणे विद्यापीठातील कर्मचारी वसाहतीमध्ये राहणाऱ्या श्री. संजय मोरे प्रशांत पाटील, राजेंद्र घोसकोंडा, ओंकार कलढोनकर, सिद्धेश मोरे ,सागर जाधव, आदित्य पंडित, राजेश सोनवणे, शिवाजी उबाळे ,शिवाजी उत्तेकर, शुभम कोरडे इतरांच्या या टीमने जमेल ती मदत स्वतः व इतरांकडून गोळा करण्यास सुरुवात केली. त्यांनी तीन दिवसांमध्ये जवळपास एक लाख ऐंशी हजार रुपयांपर्यंतच्या वस्तू गोळा केल्या. ही सर्व मदत कोकणातील १२२ कुटुंबीयांपर्यंत पोहोचविले .सुरुवातीचे तीन दिवस मदत एकत्र गोळा करण्यात गेले, नंतरच्या दोन दिवसात या सर्व मदत वस्तूंचे पॅकेट्स, पोती तयार करण्यात आले.

माणुसकी अजून जिवंत आहे

त्यानंतर दोन ट्रक मध्ये या सर्व वस्तू भरून या पंधरा जणांनी कोकणातील महाडच्या आसपास असलेल्या वाड्या-वस्त्या मध्ये राहणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचविले. या वस्तूंमध्ये औषधे, टूथपेस्ट, चहा पावडर, साखर, मीठ ,मसाला, तेल, तांदूळ ,गहू ,मेणबत्या ,कांदे ,बटाटे यासोबतच जुनी कपडे, नवे टॉवेल्स अशा अत्यावश्यक वस्तूंचा समावेश होता. काही देणगीदारांनी वस्तू तर काहींनी पैशाची मदत केली. या सर्व वस्तू १२२ कुटुंबांना वाटप केल्या यामुळे पुढील किमान दहा ते पंधरा दिवस त्यांचा उदरनिर्वाह होईल अशी सोय केली.

तूच माझा मितवा

माणुसकी अजून जिवंत आहे

हा रिक्षावाला रोजच गावातील लोकांना ने-आण करणारा त्यांना रस्ता दाखविणारा त्यांच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचविणारा पण नैसर्गिक आपत्तीमुळे याची रिक्षा थांबली आणि त्याच बरोबर संसाराची देखील चाके थांबली. त्याच्या संसार चक्राला खीळ बसू नये ,म्हणून मदतीचा हात दिला गेला . दुर्गम भागापर्यंत वाहतुकीचे रस्ते बंद पडल्याने या मदत कार्य पोहोचविणाऱ्या टीमने पायी प्रवास करून डोंगरमाथा पर्यंत वाडी वस्त्यांपर्यंत मदत पोहोचविली.

माणुसकी अजून जिवंत आहे

अंधारात बुडालेल्या संसारांना प्रकाश देण्याचा प्रयत्न

मदत कार्यासाठी दुकानातून मेणबत्त्या विकत घेताना दुकानदाराने जादा रकमेचे डिस्काउंट दिले. त्या दुकानदाराने आपली भावना व्यक्त करताना म्हटले ,”साहेब, ज्यांचे संसार अंधारात बुडाले आहेत, त्यांना प्रकाश देण्याचे सत्कार्य तुम्ही करीत आहात, यामध्ये माझाही हातभार लागला तर माझे भाग्यच आहे. म्हणून मी केवळ दुकानदारीचा व्यवहार म्हणून डिस्काऊंट देत नाही ,तर यामध्ये माझाही खारीचा वाटा असेल” . या सर्व प्रसंगांचे अवलोकन केले तर लक्षात येईल माणुसकी अजुन जिवंत आहे. कितीही मोठी आपत्ती आली तरी पृथ्वीचा समतोल यामुळेच टिकून असावा.

“सावित्रीबाई फुले यांची आठवण- १८९७ मध्ये आलेल्या प्लेगच्या साथी मध्ये सावित्रीबाई फुले यांच्या कुटुंबीयांचे योगदान आमच्या अद्यापही लक्षात आहे. मी शाळेमध्ये असताना त्यांच्याबद्दल वाचले आहे. ही गोष्ट अद्यापही माझ्या मनात कायम घर करून आहे .कदाचित मी आज या पूरग्रस्तांना जी मदत करीत आहे ,त्याचाच परिणाम असावा”, असे श्री. संजय मोरे म्हणाले.

शब्दांकन – डॉ. तुषार निकाळजे