महिला दिनी महापौर माई ढोरे यांनी प्रभागातील महिलांना घडविली मेट्रोची सफर.

महिला दिनी महापौर माई ढोरे यांनी प्रभागातील महिलांना घडविली मेट्रोची सफर.
  • स्मार्ट पिंपरी चिंचवड शहराचे नागरिक असल्याचा वाटला अभिमान

पिंपरी : जागतिक महिला दिनानिमित्त मंगळवारी (दि. ८) पिंपरी चिंचवड शहराच्या महापौर माई ढोरे यांनी प्रभागातील महिलांना महिला दिनाच्या खास पद्धतीने शुभेच्छा देत त्यांना सोबत घेऊन पिंपरी ते फुगेवाडी मेट्रोची सफर घडविली. व म्हणाल्या कि जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.

यावेळी महापौर माई ढोरे, माजी नगरसेविका शोभाताई अदियाल, भाजपा महिला अध्यक्षा पिंपरी चिंचवड शहर उज्वला गावडे, सुप्रिया चांदगुडे, कविता भिसे, मोहिनी मेटे, अलका शिवाजी काटे, मंदा वाळके आणि प्रभागातील महिलावर्ग व पिंपळे सौदागर, सांगवी व पिंपरी चिंचवड मधील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कुंदा संजय भिसे म्हणाल्या, भाजपच्या सत्ताकाळात मेट्रो सत्यात उतरली आहे. रविवारी पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील पिंपरी ते फुगेवाडी मेट्रोचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते उद्घाटन व लोकार्पण सोहळा पार पडला आहे. पिंपरी-चिंचवडकरांच्या सेवेत मेट्रो दाखल झालेली आहे. त्यामुळे शहराच्या वैभवात आणखी भर पडली आहे. प्रभागातील महिलांमध्ये मेट्रोप्रवास हा कुतूहलाचा विषय बनला होता. या मेट्रो प्रवासाने त्याही भारावून गेल्या आणि आपण खरचं स्मार्ट पिंपरी चिंचवड शहराचे नागरिक असल्याचा त्यांना अभिमान वाटला.