पिंपरी चिंचवड महापालिकेचा नाकर्तेपणा : रहाटणीत वाळूचा ट्रक फसला (व्हिडीओ)

पिंपरी चिंचवड महापालिकेचा नाकर्तेपणा : रहाटणीत वाळूचा ट्रक फसला (व्हिडीओ)

पिंपरी, (लोकमराठी) : रहाटणीतील गोडांबे चौक ते तापकीर मळा चौक डीपी रस्त्यावर वाळूचा ट्रक रस्त्यात खचून रूतून बसला. शनिवारी (ता. 23) सकाळी ही घटना घडली. दरम्यान, रस्त्याचे काम सुरू असल्याने त्यामुळे काही काळ वाहतूकीचा खोळंबा झाला.

रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू असून ड्रेनेज व सांडपाणी वाहिनीसाठी रस्ता खोदला गेला. मात्र, संबंधीत ठेकेदाराने योग्य उपाययोजना न केल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नाकर्तेपणावर नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.