चेसबॉक्सिंग राष्ट्रीय चॅम्पियनशिप २०२१ मध्ये संदीप यादवने पटकावले सुवर्णपदक

चेसबॉक्सिंग राष्ट्रीय चॅम्पियनशिप २०२१ मध्ये संदीप यादवने पटकावले सुवर्णपदक

पुणे: पीसीएसएफ बॉक्सिंग क्लबचे विद्यार्थी संदीप सीताराम यादव कोलकाता येथे आयोजित 9 व्या चेसबॉक्सिंग राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2021 मध्ये सुवर्णपदक जिंकले. ते कमांडिंग ऑफिसर कर्नल गुरतेज सिंग यांच्या अंतर्गत भारतीय सैन्य 101 इंजिनीअर रेजिमेंट मध्ये सेवा देत आहेत.

कर्नल गुरतेज सिंह आणि कॅप्टन रंगत सिंह यांनी संदीप यादव यांचे कौतुक केले. कर्नल गुरतेज सिंग, कॅप्टन रंगत सिंह आणि त्यांच्या रेजिमेंटच्या सर्व सदस्यांच्या पाठिंब्यामुळे आणि प्रेरणेमुळे तो सुवर्ण मिळवू शकला, असे संदीपने सांगितले.

चेसबॉक्सिंग राष्ट्रीय चॅम्पियनशिप २०२१ मध्ये संदीप यादवने पटकावले सुवर्णपदक